वाशिम : डोंगरकिन्ही येथे ट्रॅक्टर विहिरीत पडले; एकजण जागीच ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 07:26 PM2018-02-08T19:26:22+5:302018-02-08T19:51:38+5:30

मालेगाव (वाशिम) : चालकाचा तोल गेल्याने चालू ट्रॅक्टर विहिरीत पडले. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे ७ फेब्रुवारीला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

Washim: A tractor drowned in Dongrkhihi; One killed on the spot! | वाशिम : डोंगरकिन्ही येथे ट्रॅक्टर विहिरीत पडले; एकजण जागीच ठार!

वाशिम : डोंगरकिन्ही येथे ट्रॅक्टर विहिरीत पडले; एकजण जागीच ठार!

googlenewsNext
ठळक मुद्दे बुधवारी रात्री १0 वाजता मुरूम काढण्याचे काम सुरू असताना ट्रॅक्टर पडले ५0 फूट खोल विहिरीतघटनेनंतर तासाभरानंतर काढण्यात आला ट्रॅक्टरचालक युवकाचा मृतदेह गुरुवारी सकाळी क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आली ट्रॅक्टर व ट्रॉली

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : चालकाचा तोल गेल्याने चालू ट्रॅक्टर विहिरीत पडले. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे ७ फेब्रुवारीला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
वाशिम जिल्ह्यातील डोंगरकिन्ही येथील दादाराव गवई यांच्या मालकीचे ट्रॅक्टर मधुकर गाभणे यांच्या शेतातील विहिरीवर मुरूम आणण्यासाठी गेले होते. गवई यांचा मुलगा सचिन हा ट्रॅक्टर चालवत होता. दरम्यान, मुरूम भरत असतानाच अचानक तोल गेल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह ५० फूट खोल विहिरीमध्ये पडले. यात सचिनचा जागीच मृत्यू झाला. तासभरानंतर त्याचे पार्थिव विहिरीतून बाहेर काढण्यातआले. तसेच ८ फेब्रुवारीला सकाळी ट्रॅक्टर व ट्रॉली क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून काढण्यात आली. 

Web Title: Washim: A tractor drowned in Dongrkhihi; One killed on the spot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.