वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात चार पिल्लांसह बिबट दिसल्याची चर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:21 IST2017-12-27T20:13:15+5:302017-12-27T22:21:11+5:30
मानोरा (वाशिम ) : सोमेश्वरनगरातील शेतशिवारात कापूस वेचणा-या महिलांना २७ डिसेंबर रोजी चार बछड्यांसह मादी बिबट दिसल्याची चर्चा असल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर वनविभागाच्या अधिका-यांनी या भागाची पाहणी केली असता, त्यांना कोणातेच श्वापद परिसरात आढळून आले नाही.

वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात चार पिल्लांसह बिबट दिसल्याची चर्चा!
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम ): तालुक्यातील सोमेश्वरनगर शेतशिवारातील धनसिंग चव्हाण यांच्या शेतात २७ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास कापूस वेचताना महिलांना चार पिल्लांसह मादी बिबट दिसले. त्यामुळे धास्तावलेल्या महिलांनी शेतातून घरचा रस्ता धरला. दरम्यान, ही चर्चा परिसरात पसरल्याने चांगलीच खळबळ उडाली. वनविभागाच्या अधिका-यांनी या भागाची पाहणी केली असता, त्यांना कोणातेच श्वापद परिसरात आढळून आले नाही.
जंगलास लागूनच असलेल्या धनसिंग अमरसिंग चव्हाण यांच्या शेतात कापूस वेचण्याकरिता सात-आठ महिला गेल्या होत्या. यादरम्यान सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एका महिलेस बिबट्याचे पिल्लू दिसले. सुरूवातीला मांजरीचे पिल्लू असावे, म्हणून महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कापूस वेचताना आशा चव्हाण नामक महिलेला दुरवर बिबट दिसल्याचे तिने अन्य महिलांना सांगितले. या घटनेची चर्चा सर्वत्र पसरल्याने शेतात असलेल्या महिला व शेतक-यांनी तातडीने घरचा रस्ता धरला. चराईसाठी नेलेली जनावरे देखील त्या परिसरातून अन्यत्र हलविण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिका-यांनी परिसर पिंजून काढला, मात्र त्यांना कोणातेही श्वापद वा त्याचे पगमार्ग आढळून आले नाही.
या घटनेची माहिती कळताच आम्ही सोमेश्वरनगर भागाची पाहणी केली; परंतु कुठेही परिसरात हिंस्त्र श्वापद वा ते असल्याची चिन्हे आम्हाला आढळून आली नाहीत. शेतात काम करणा-या महिलांना कदाचित भास झाला असावा. परिसरात काही लोकं वाघ दिसल्याचीही अफवा पसरवित आहेत. मात्र वाशिम जिल्ह्यात एकही नर वा मादी वाघ नाही.
- पी.एन. नानोटे
वनपरिक्षेत्र अधिकारी, मानोरा