वाशिम उपविभाग : पोलीस स्टेशनस्तरावर १४० ग्रामसुरक्षा दलाची स्थापना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 15:09 IST2017-12-22T15:08:11+5:302017-12-22T15:09:55+5:30
वाशिम - गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न म्हणून वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन स्तरावर एकूण १४० ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.

वाशिम उपविभाग : पोलीस स्टेशनस्तरावर १४० ग्रामसुरक्षा दलाची स्थापना !
वाशिम - गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न म्हणून वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन स्तरावर एकूण १४० ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.
अलिकडच्या काळात घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यावर नियंत्रण म्हणून तसेच गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती मिळावी या दृष्टिकोनातून ग्राम सुरक्षा दल पुनरूज्जीवित करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियंका मीना यांना दिले होते. या अनुषंगाने वाशिम उपविभागातील रिसोड पोलीस स्टेशनअंतर्गत ५०, मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ५० व शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत ४० ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. तरुण व उत्साही ग्राम सुरक्षा दल सदस्यांचा समावेश करण्यात आला. ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून घरफोडी, चोरीच्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्याबरोबरच अवैध धंद्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पोलीस मित्र किंवा पोलीस प्रशासनाचे विश्वासू म्हणून ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना कार्य करावे लागणार आहे. जिल्ह्यातील अन्य पोलीस स्टेशनमध्येदेखील ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली जाणार आहे, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.