शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

वाशिम : प्रलंबित विहिरी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याला एक कोटींचा निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 2:33 AM

वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या ४५0 विहिरींची कामे आता मार्गी लागणार आहेत. ७५ टक्के पूर्ण असलेल्या या विहिरींची उर्वरित कामे करण्यासाठी आवश्यक असलेला १ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून, जिल्ह्यातील सहाही तालुक्यांच्या पंचायत समिती स्तरावरून अपूर्ण विहिरींचा अहवाल मागवून त्यानुसार निधीचे वितरण केले जाईल, अशी माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देपंचायत समिती स्तरावरून मागविले प्रस्ताव कुशल मनुष्यबळावर होणार निधी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित असलेल्या ४५0 विहिरींची कामे आता मार्गी लागणार आहेत. ७५ टक्के पूर्ण असलेल्या या विहिरींची उर्वरित कामे करण्यासाठी आवश्यक असलेला १ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून, जिल्ह्यातील सहाही तालुक्यांच्या पंचायत समिती स्तरावरून अपूर्ण विहिरींचा अहवाल मागवून त्यानुसार निधीचे वितरण केले जाईल, अशी माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी शनिवारी दिली.रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विहिरींची कामे करण्यात आली; मात्र सिमेंट, रेती, गिट्टी यांसह काही ठिकाणी जेसीबीने झालेल्या या कामांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून निधी मिळालेला नव्हता. परिणामी, ७५ टक्के काम झाल्यानंतर तब्बल ४५0 विहिरींच्या काम पूर्णत्वाचा दाखला मिळणे बाकी होते. यासंदर्भात रोजगार हमी योजना विभागाने शासनाकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे पूर्ण झालेल्या विहिरींची उर्वरित कामे मार्गी लावण्याकरिता शासनाने जिल्ह्याला १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी अपूर्ण विहिरींची सद्य:स्थिती आणि काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसंदर्भातील सविस्तर अहवाल रोजगार हमी योजना कार्यालयाकडे सादर केल्यानंतर निधी वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती सुनील कोरडे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम