वाशिम नगरपालिकेचा ९.९४ कोटी रुपये कर थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:47 PM2018-09-05T12:47:02+5:302018-09-05T12:48:31+5:30

वाशिम :   नगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांकडे ९ कोटी ९४ लाख ७६ हजार रुपये कर थकीत आहे. सदर कर वसुलीसाठी नगरपरिषदेतील कर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कसोशिने प्रयत्न करतांना दिसून येत आहेत.

Washim municipality has exhausted tax of Rs 9.94 crores | वाशिम नगरपालिकेचा ९.९४ कोटी रुपये कर थकीत

वाशिम नगरपालिकेचा ९.९४ कोटी रुपये कर थकीत

Next
ठळक मुद्देदरवर्षी कर वसुलीसाठी नगरपरिषदेच्यावतिने पथक निर्माण करुन करवसुली केल्या जाते. सूचना देवूनही कर भरणा न करणाºया ११ मालमत्ताधारकांच्या प्रतिष्ठानावर जप्ती करण्यात आली होती. याहीवर्षी १५० थकीत मालमत्ता करधारक रडारवर असल्याचे सांगण्यात आले.

- नंदकिशोर नारे 
वाशिम :   नगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांकडे ९ कोटी ९४ लाख ७६ हजार रुपये कर थकीत आहे. सदर कर वसुलीसाठी नगरपरिषदेतील कर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कसोशिने प्रयत्न करतांना दिसून येत आहेत.
नगरपरिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात या करीता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. दरवर्षी कर वसुलीसाठी नगरपरिषदेच्यावतिने पथक निर्माण करुन करवसुली केल्या जाते. याहीवर्षी एक पथक तयार करुन कराचा भरणा करण्याबाबत जनजागृती केल्या जात आहे. आॅक्टोबर महिन्यापर्यंत कराचा भरणा न केल्यास नगरपालिकेच्यावतिने जप्ती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती वाशिम नगरपरिषदेचे करनिरिक्षक अ.अजिज अ.सत्तार यांनी दिली.  गतवर्षी कराचा भरणा करण्याच्या सूचना देवूनही कर भरणा न करणाºया ११ मालमत्ताधारकांच्या प्रतिष्ठानावर जप्ती करण्यात आली होती. याहीवर्षी १५० थकीत मालमत्ता करधारक रडारवर असल्याचे सांगण्यात आले. थकीत कराचा भरणा करुन मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन नगरपरिषदेच्यावतिने करण्यात आले आहे. मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरिक्षक अ.अजिज अ. सत्तार करवसुलीसाठी प्रयत्न करीत आहे. त्यांना साहेबराव उगले, वरिष्ठ लिपीक साहेबराव उगले, करसंग्राहक संतोष किरळकर, मनोज इंगळे, शिवाजी इंगळे, दत्तात्रय देशपांडे, नाजीमभाई, रमजान बेनीवाले, संजय काष्टे, कुणाल कनोजे, एस.एल. खान सहकार्य करीत आहेत.

१५० थकीत मालमत्ताधारक कर विभागाच्या रडारवर
गतवर्षी कराचा भरणा न करणाºया ३० मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यावर्षी यामध्ये वाढ दिसत असून सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कराचा भरणा न करणारे १५० थकीत मालमत्ताधारक नगरपालिकेच्या रडारवर दिसून येत आहेत. यांना नोटीस बजावणार असल्याचे सांगण्यात आले. वेळेच्या आत कराचा भरणा केल्यास मालमत्ता धारकांना लागणारे २ टक्के व्याज आकारल्या जात नाही.


८३ लाख ७६ हजार पाणी कर!
नगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांकडे असलेल्या ९ कोटी ९४ लाख ७६ हजारापैकी पाणी कर ८३ लाख ७६ हजार रुपये आहे. पाणी कर न भरणाºया थकीतधारकांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय सुध्दा घेण्यात आला आहे.

Web Title: Washim municipality has exhausted tax of Rs 9.94 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.