वाशिम : मृतांच्या कुटुंबीयांचं माणिकराव ठाकरे यांनी केले सांत्वन, मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 14:57 IST2018-02-14T14:56:43+5:302018-02-14T14:57:05+5:30
उमरा कापसे ते शेगाव या पालखी सोहळ्यादरम्यान अपघाती निधन झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे 13 फेब्रुवारीला भेट घेतली होती.

वाशिम : मृतांच्या कुटुंबीयांचं माणिकराव ठाकरे यांनी केले सांत्वन, मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही
वाशिम - उमरा कापसे ते शेगाव या पालखी सोहळ्यादरम्यान अपघाती निधन झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे 13 फेब्रुवारीला भेट घेतली होती. गेल्या 21 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत वाशिम तालुक्यातील उमरा कापसे येथून यंदाही 1 फेब्रुवारीला काढण्यात आलेल्या पायदळ वारीत १७० पेक्षा अधिक गजानन भक्तांनी सहभाग नोंदविला होता. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आतूर झालेल्या या वारीतील वारक-यांवर मात्र शेगावला पोहोचण्यापूर्वीच काळाने झडप घातली. 5 फेब्रुवारीला बाघ फाट्यानजिक दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास काहीकाळ विसावा घेण्यासाठी थांबलेले असताना भरधाव वेगात येणा-या ट्रकने वारीतील तीनचाकी वाहनास जबर धडक दिली. यात वाहनात बसून असलेले काशिनाथ चंद्रभान कापसे (वय 65), रमेश धनाजी कापसे (वय 35), लिलाबाई बळीराम कापसे (वय 58) सर्व राहणारे उमरा आणि रामजी नामदेव काकडे (वय 50) राहणारे जवळा या चार वारक-यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट दिली. यावेळी मृतकाच्या कुटुंबाला शासनाकडून ठोस अर्थसहाय्य मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांशी फोनव्दारे संपर्क साधून आपबिती कथन केली. मुख्यमंत्र्यांनीदेखील लवकरात लवकर मदत देण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिका-यांशीदेखील संपर्क साधून अर्थसहाय्य, मदतप्रकरणी योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करावी, अशा सूचना ठाकरे यांनी केल्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीपराव सरनाईक, तहसिलदार बलवंत अरखराव, गटविकास अधिकारी वाघ, माजी जि.प. सदस्य दिलीपराव देशमुख, जि.प. सदस्य नथ्थुजी कापसे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त उपस्थित होते.