वाशिम : शेकडो हेक्टरवरील पिके उदध्वस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 02:11 PM2019-10-29T14:11:42+5:302019-10-29T14:11:51+5:30

शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब आल्याने शेतकºयांवर जणू आभाळच कोसळले आहे.

Washim: Hundreds of hectares of crops destroyed! | वाशिम : शेकडो हेक्टरवरील पिके उदध्वस्त!

वाशिम : शेकडो हेक्टरवरील पिके उदध्वस्त!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस झाल्याने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, प्रशासनाने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध स्वरूपातील अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाऊस अनियमित असल्याने मूग, उडीदाचे अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऐन सोयाबीन सोंगणीच्या कालावधीत पाऊस आल्याने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. आता २७ व २८ आॅक्टोबर रोजी वाशिम तालुक्यासह रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब आल्याने शेतकºयांवर जणू आभाळच कोसळले आहे. वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, काजळांबा, सावळी, तांदळी, अडोळी, अनसिंग, तोंडगाव यासह मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील रहिवासी व नदि काठावरील मारसुळ शिवारात शेतजमीन असलेले इंदल पुरुषोत्तम, गोकुल पुरुषोत्तम, देवलाल पुरुषोत्तम, गोपाल पुरुषोत्तम यासह अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पाण्यात शेतात झाकुण ठेवलेल्या सोयाबीन सुड्याही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. तूर पीकही खरडून गेले. सावळी येथील कपाशी पीक खरडून गेले.जिल्हयात झालेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार पीक नुकसान सूचना फॉर्म भरून विमा कंपनीच्या अधिकृत मेलवर टाकावा लागणार आहे. याबाबत शेतकºयांमध्ये जनजागृती करावी तसेच नमुना अर्ज द्यावा असे निर्देश कृषी विभागाच्यावतिने देण्यात आले. आहे. शेतकºयांनी कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


सरपंच संघटना आक्रमक
संततधार व अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन भरपाई जाहीर करण्यासाठी सरपंच संघटना आक्रमक झाली असून ३० आॅक्टोबर रोजी तहसीलारांची भेट घेणार आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकºयांनी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील लुंगे यांनी केले आहे.


पीक नुकसानाचे वैयक्तिक पंचनामे होणार
पावसामुळे उभ्या पिकांचे तसेच काढणी पश्चात तयार न झालेल्या पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक शेतकºयांचे पंचनामे करावे, सोबत पीक नुकसानाचा सूचना फॉर्म भरून ४८ तासांच्या आत प्रधानमंत्री पीक विमा योजना काढलेल्या शेतकºयांनी विमा कंपनीच्या मेल आयडीवर पाठवण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी आधीच दिले आहेत. दरम्यान याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे. राज्यात सर्वत्र १८ आॅक्टोबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकºयांना मदत मिळावी याकरिता कृषी विभागाच्यावतिने तातडीने पंचनामे करावे लागणार असून तशी व्यवस्था कृषी विभागाच्यावतिने केली जाणारा आहे. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावर यांनी कळविले.


नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करा - राजेंद्र पाटणी
वाशिम : जिल्ह्यात सर्वदूर आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून बाधित क्षेत्रात तत्काळ पंचनामे करावे, अशा सूचना आमदार राजेंद्र पाटणी यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. शेतकºयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत शासनाने यापूर्वी तत्काळ मदत केली आहे. सध्या जिल्ह्यात विविध पिकांच्या काढण्या सुरू आहेत. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकºयांना दिलासा देण्यासाठी नुकसानाचे पंचनामे त्वरित करण्यात यावे, अशा सूचना आमदार पाटणी यांनी दिल्या आहेत.

Web Title: Washim: Hundreds of hectares of crops destroyed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.