वाशिम - हिंगोली महामार्गावर भरधाव ट्रकने महाविद्यालयीन युवतीस चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 18:49 IST2018-03-06T18:49:16+5:302018-03-06T18:49:16+5:30
वर्षीय युवतीच्या स्कुटरला ट्रकने जबरदस्त धडक दिली. या धडकेत शितलचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून तीची मैत्रीण अश्वीनी विठ्ठल शिंदे जखमी झाली.

वाशिम - हिंगोली महामार्गावर भरधाव ट्रकने महाविद्यालयीन युवतीस चिरडले
वाशिम : हिंगोली महामार्गावरील फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या शितल भास्करराव वाकुडकर (रा. वाघोली ता.जि.वाशिम) या २० वर्षीय युवतीच्या स्कुटरला ट्रकने जबरदस्त धडक दिली. या धडकेत शितलचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून तीची मैत्रीण अश्वीनी विठ्ठल शिंदे जखमी झाली. ही घटना हिंगोली मार्गावरील रेल्वे गेटनजीक घडली.
वाघोली (ता.जि. वाशिम) येथील भास्करराव वाकुडकर यांची मुलगी शितल ही शिक्षणानिमित्त वाशिम येथे वास्तव्यास आहे. शितल ही वाशिम ते हिंगोली मार्गावर असलेल्या फार्मसी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. दररोज प्रमाणे ६ मार्च रोजी शितल व तिची मैत्रीण अश्वीनी या दोघी स्कुटरने महाविद्यालयात जात होत्या. दरम्यान, रेल्वे गेटजवळ पाठीमागुन येणाºया भरधाव ट्रकने स्कुटरला धडक दिली. या धडकेत शितल हिचा जागीच मृत्यू झाला असून तिची मैत्रीण अश्वीनी जखमी झाली. धडक दिल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला.
या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनला चंद्रकांत ज्ञानबा वाकुडकर यांनी फिर्याद दाखल केली. पोलीसांनी अज्ञात ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्ष वाढवे करीत आहेत.