वाशिम: मुसळवाडी येथील आश्रम शाळेत सायबर क्राईमबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 13:40 IST2018-02-19T13:38:01+5:302018-02-19T13:40:27+5:30
वाशिम: महाराष्ट्रात सध्या सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळेतील विद्याथी, विद्यार्थ्यांना इंटरनेट, सोशल मिडियाचा वापर व सुरक्षीतता या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे

वाशिम: मुसळवाडी येथील आश्रम शाळेत सायबर क्राईमबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
वाशिम: महाराष्ट्रात सध्या सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळेतील विद्याथी, विद्यार्थ्यांना इंटरनेट, सोशल मिडियाचा वापर व सुरक्षीतता या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत सोमवार १९ फेब्रुवारीला मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी आश्रम शाळेत जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार किरणकुमार साळवे आणि महिला साक्षरता समितीच्यावतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सोशल मिडियाचा आधार घेऊन मुलींची बदनामी करण्याचे प्रकार, तसेच आॅनलाईन शॉपिंगद्वारे फसवणूक, एटीएमद्वारे फसवणूक, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांच्यावतीने जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून, गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पथकांची नियुक्तीही केली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून मुसळवाडी येथील आश्रम शाळेत जऊळका रेल्वे स्टेशनच्यावतीने मुसळवाडी आश्रम शाळेत सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.