शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

वाशिम: शेतकरी अडचणीत : नवीन तूर बाजारात; हमीभावापेक्षा हजार रुपयाने कमी दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 6:01 PM

आता नवीन तूर विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये येत आहे तर दुसरीकडे किमान आधारभूत किंमतीपेक्षा तब्बल एक हजार रुपयाने कमी दर मिळत असल्याने शेतक-यांच्या अडचणींत भर पडत आहे.

वाशिम: आता नवीन तूर विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये येत आहे तर दुसरीकडे किमान आधारभूत किंमतीपेक्षा तब्बल एक हजार रुपयाने कमी दर मिळत असल्याने शेतक-यांच्या अडचणींत भर पडत आहे. शुक्रवारी बाजार समित्यांमध्ये तूरीला ३८०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर  होता. वाशिम जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ५० हजार हेक्टरहून अधिक  क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती. वातावरणात वेळोवेळी झालेल्या विपरित बदलांमुळे या पिकाला आधीच फटका बसला. अपुरा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे परिणाम होऊन या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. विविध संकटातून वाचलेले तूर पीक आता शेतक-यांच्या घरात येत आहे. ऊसणवारीचे व अन्य आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना तूर विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नवीन तूर बाजारात येताच, तूरीचे दर अपेक्षेपेक्षाही खाली घसरले आहेत. मध्यम प्रतीच्या तूरीला ३९०० ते ४१०० या दरम्यान प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. यामधून तूरीचा लागवड खर्चही वसूल होणार नसल्याचा दावा शेतक-यांनी केला. केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत प्रती क्विंटल ५ हजार ४५० रुपये निश्चित केली आहे. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ३८०० ते ४५०० रुपयादरम्यान तूरीला दर मिळत असल्याचे दिसून येते. हमीभावापेक्षा तब्बल एक हजार रुपये कमी दर मिळत असल्याने शेतक-यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. हमीभावाने तूरीची खरेदी व्हावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी महादेव सोळंके यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी