शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Washim: ठरलं! २८ ला मिळणार 'पीएम'चे दोन हजार, जिल्ह्यातील १.६१ लाख शेतकऱ्यांना मिळेल १६ वा हप्ता

By दिनेश पठाडे | Updated: February 23, 2024 15:33 IST

Washim News:केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत १५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले.

- दिनेश पठाडेवाशिम - केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत १५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. योजनेचा १६ वा हप्ता कधी मिळेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर केंद्र शासनाने २८ फेब्रुवारीला शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याचे दोन हजार वर्ग केले जाणार असल्याचे निश्चित केले आहे. 

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे दिले जाते. एका आर्थक वर्षात एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च अशा चार महिन्याच्या कालावधीत हप्ता वर्ग केला जातो. यापूर्वी योजनेचा १५ वा हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळाला होता. लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेपूर्वी १६ वा हप्ता मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. आता तारीख निश्चित करण्यात आल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. ई-केवायसी व इतर अनुषंगीक प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील  पात्र असलेल्या  १,७०,२०० शेतकऱ्यांपैकी १ लाख ६१ हजार ५११ जणांनी केवायसी पूर्ण केली असून त्यांना हा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर अजूनही ८ हजार ६८९ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली नसल्यामुळे संख्यानिश्चित केल्यानंतर त्यांना लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.  राज्य शासनाचा दुसरा हप्ताही लवकरचपीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने देखील नमो महासन्मान किसान निधी योजना सुरु केली आहे.  त्याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार मिळतील. योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. दुसरा हप्ता देण्यासाठी राज्य स्तरावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा हप्ताही लवकरच मिळणार आहे. तथापि, त्याबाबत अद्याप तारीख निश्चित नसल्याचे सांगण्यात आले आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता मिळेल.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाwashimवाशिम