शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

वाशिम जिल्हा:  उमरा कापसे येथे अज्ञात त्वचा रोगाची साथ; विद्यार्थ्यांसह वृध्दांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 1:17 PM

वाशिम: तालुक्यातील उमरा कापसे येथील १२ विद्यार्थ्यांसह वृध्दांना गाल, मान, हात , पायावर फोड होवून त्याला खाज सुटणाºया त्वचा रोगाची साथ पसरली आहे.

ठळक मुद्देयेथील एक वर्षांपासून ते ७० वर्षिय वृध्दांच्या अंगावर, मानेवर, हातावर, गालावर,पायावर फोड  येवून त्याला मोठया प्रमाणात खाज येत आहे.हा त्वचारोग झाल्यानंतर ८ ते १० दिवस ओलाडल्यांवर त्याचा रंग काळा होतो व त्यानंतर मोठया प्रमाणात खाज सुरु होत आहे.उमरा कापसे येथे काही दिवसांपासून या त्वचारोगाचा फैलाव झाला असताना याची आरोग्य विभागाला खबर सुध्दा दिसून येत नाही.

वाशिम: तालुक्यातील उमरा कापसे येथील १२ विद्यार्थ्यांसह वृध्दांना गाल, मान, हात , पायावर फोड होवून त्याला खाज सुटणाºया त्वचा रोगाची साथ पसरली आहे. आरोग्य विभागाची चमू अद्याप या गावात पोहचली नाही.

उमरा कापसे येथे काही दिवसांपासून या त्वचारोगाचा फैलाव झाला असतांना याची आरोग्य विभागाला खबर सुध्दा दिसून येत नाही. येथील एक वर्षांपासून ते ७० वर्षिय वृध्दांच्या अंगावर, मानेवर, हातावर, गालावर,पायावर फोड  येवून त्याला मोठया प्रमाणात खाज येत आहे. हा त्वचारोग झाल्यानंतर ८ ते १० दिवस ओलाडल्यांवर त्याचा रंग काळा होतो व त्यानंतर मोठया प्रमाणात खाज सुरु होत आहे. गावातील या त्वचा रोगाने १० ते १२ विद्यार्थी, मुलांचा तर काही ७० वर्षिय वृध्दांचा समावेश असल्याचे गावात पाहणी केले असता दिसून आले. गावातील पुरुषोत्तम पांडुरंग कापसे (१४), मनिषा भगत (१२), पूनम विष्णू कापसे (११), अक्षय गजानन भगत (१२), दाजिबा भगत (६०), विश्वदिप वाकुडकर (१०), किसन नारायण कापसे (७०), विष्णु भागवत कापसे (३५), पांडुरंग नारायण कापसे (२३), गौतम वाकुडकर (१०), विठ्ठल देविदास कापसे (१४) सद्यस्थितीत या त्वचारोगाने त्रस्त आहेत. यामधील अक्षय गजानन भगत व दाजीबा रामजी भगत यांचा हा त्वचा रोग फार पूर्वीपासून असल्याची माहिती आहे. या आजारामुळे अंगाला येत असलेल्या खाजीमुळे विद्यार्थी, नागरिक त्रस्त असून रुग्णांनी आपआपल्या परिने खासगी उपचार सुरु केले आहेत. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही. वाशिमपासून अतिशय जवळ असलेल्या उमरा कापसे येथे त्वचारोगामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असतांना याची साधी खबर सुध्दा आरोग्य विभागाला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. येथे आरोग्य विभागाच्या पथकाने भेट देवून मार्गदर्शन करणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य