वाशिम जिल्ह्यात ४० मीमी पाऊस; शिरपूर-भेरा रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:52 IST2020-06-13T10:51:48+5:302020-06-13T10:52:09+5:30
जिल्हयात ११ जून सायंकाळी ६ ते १२ जूनला सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ३९.३८ मीमी पावसाची नोंद झाली.

वाशिम जिल्ह्यात ४० मीमी पाऊस; शिरपूर-भेरा रस्ता बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयात ११ जून सायंकाळी ६ ते १२ जूनला सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ३९.३८ मीमी पावसाची नोंद झाली असून, रिसोड ते मालेगाव या महामार्गालगत नालीची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरचे सर्व पाणी शेतात घुसले. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी संंबंधित कंत्राटदारांनी आतापासूनच पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी शेतकऱ्यांनी १२ जून रोजी केली.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना वेग देत पेरणीसाठी जमिन सज्ज ठेवली. १० जूनपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. दुसरीकडे काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस नसल्याने त्या ठिकाणच्या शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी १२ जून रोजी केले.
१० जून रोजी दुपारी तसेच रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाला. ११ जूनला सायंकाळी वाशिमसह मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड, मानोरा तालुक्यात बºयापैकी पाऊस झाला. १२ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हयात सरासरी ३९.३८ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक पाऊस मालेगाव तालुक्यात ६८.३० मीमी झाला. सर्वात कमी पाऊस मानोरा तालुक्यात ११.७८ मीमी झाला. रिसोड तालुक्यात ५३.१३ मीमी, कारंजा तालुक्यात ३५.५० मीमी, मंगरूळपीर तालुक्यात ३९.१४ मीमी पाऊस झाला. सर्वत्र दूरवर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. जेथे जमिनीमध्ये चार इंच ओलावा आहे, तेथे पेरणी सुरू होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, ४६१ बी क्रमांकाचा मालेगाव, शिरपूर, रिसोड, हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने ११ जूनच्या रात्री जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकºयांच्या शेतात पाणी घुसले. शेतात पाणी घुसणार नाही, अशी कायमस्वरुपी व्यवस्था करण्याची मागणी शेतकºयांनी केली.
भेरा रस्ता बंद !
शिरपूर ते भेरा या मार्गादरम्यान एका नाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. ११ जून रोजी सायंकाळी तसेच रात्रीच्या सुमारास दमदार पाऊस झाल्याने पुलाचे काम प्रभावित झाले तसेच पर्यायी रस्ता चिखलमय झाला. त्यामुळे या दरम्यानची वाहतूक १२ जून रोजी ठप्प होती. यामुळे शिरपूर ते भेरा या मार्गाने प्रवास करणाºया वाहतूकदारांची चांगलीच गैरसोय झाल्याचे दिसून आले.
पेरणीची घाई नको
महसूल मंडळाच्या पर्जन्यमापकाच्या नोंदीमध्ये जरी समाधानकारक पाऊस झालेला दिसत असला तरी शेतकºयांनी त्यांचे संबंधित गावामध्ये ७५ मीमी असा समाधानकारक पाऊस झाल्याची खातरजमा करावी. जमीनीमध्ये चार इंच ओलावा झाल्याची खात्री करुन प्रत्येक शेतकºयांनी पेरणीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले.
११ जूनच्या रात्रीदरम्यान बºयापैकी पाऊस झाला. जेथे जमिनीमध्ये चार इंच ओलावा आहे, ७५ मिमी असा समाधानकारक पाऊस झाल्याची खातरजमा केल्यानंतरच शेतकºयांनी पेरणी करावी. जेथे ४ इंच ओलावा नाही, तेथे सध्याच पेरणीची सुरूवात करू नये.
-एस.एम. तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी