वाशिम जिल्ह्याला मिळाल्या आणखी नऊ रूग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:07 PM2020-10-02T12:07:23+5:302020-10-02T12:07:38+5:30

Health Department, Ambulance नऊ रुग्णवाहिका मिळाल्या असून, आणखी दोन रुग्णवाहिका लवकरच मिळणार आहेत.

Washim district received nine more ambulances | वाशिम जिल्ह्याला मिळाल्या आणखी नऊ रूग्णवाहिका

वाशिम जिल्ह्याला मिळाल्या आणखी नऊ रूग्णवाहिका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, कोरोना काळात रुग्णांची ने-जाण करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यासाठी ११ रुग्णवाहिका मंजूर केल्या. आतापर्यंत नऊ रुग्णवाहिका मिळाल्या असून, आणखी दोन रुग्णवाहिका लवकरच मिळणार आहेत.
कोरोना काळात आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात ४४ शासकीय रुग्णवाहिका आहेत. यामध्ये ३३ शासकीय रुग्णवाहिका आणि १०८ क्रमांकाच्या ११ रुग्णवाहिकांचा समावेश आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांची ने-आण करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका खरेदीवर भर देण्यात येत आहे. आकांक्षित जिल्हा म्हणून निती आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरणसाठी प्राप्त झालेल्या निधीतून ११ रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी ७ आणि जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांसाठी ४ अशा रुग्णवाहिकांचा समावेश आहे. यापैकी दोन रुग्णवाहिका १५ आॅगस्ट रोजी, १० दिवसांपूर्वी सात अशा एकूण ९ रुग्णवाहिका मिळाल्या.

एकूण रुग्णवाहिकांची संख्या पोहचली ५३ वर
जिल्ह्यात कोरोना काळात ग्रामीण भागातील रुग्णांना दवाखान्यांपर्यंत आणण्याची सुविधा अधिक जलद गतीने उपलब्ध व्हावी, याकरीता रुग्णवाहिकेवर भर देण्यात येत आहे. नव्याने नऊ रुग्णवाहिका मिळाल्याने आता जिल्ह्यात एकूण ५३ शासकीय रुग्णवाहिकांची संख्या झाली आहे.


दोन रुग्णवाहिका लवकरच मिळणार
 आतापर्यंत ११ पैकी नऊ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. उर्वरीत दोन रुग्णवाहिकादेखील लवकरच सेवेत उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

 

 

 

Web Title: Washim district received nine more ambulances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.