वाशिम जिल्ह्यात दोन वर्षात पूर्ण झाले केवळ ७५२ शेततळे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 14:12 IST2018-01-04T14:09:23+5:302018-01-04T14:12:52+5:30
वाशिम: ९ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस मंजुरात मिळाली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यापैकी ७५२ शेततळेच पूर्ण झाले उर्वरित ११४८ शेततळे वाटपाकरिता कृषी विभागाची चांगलीच दमछाक होत आहे.

वाशिम जिल्ह्यात दोन वर्षात पूर्ण झाले केवळ ७५२ शेततळे!
वाशिम: ९ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस मंजुरात मिळाली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यापैकी ७५२ शेततळेच पूर्ण झाले उर्वरित ११४८ शेततळे वाटपाकरिता कृषी विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. दरम्यान, इच्छुक शेतकºयांनी ‘आॅनलाईन’ अर्ज सादर करून योजनेत सहभागी होण्याचे आवाहन पुन्हा एकवेळ गुरूवारी करण्यात आले आहे.
शेतमाल उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने पुर्वी राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांची मोडतोड करून ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली. मात्र, या योजनेत सहभागी होण्यासाठी किचकट अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. त्यानुसार, टंचाईग्रस्त भागातील ज्या गावात मागील ५ वर्षात किमान एक वर्ष तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली, अशा गावांमध्ये शेततळे घेण्यास मान्यता देण्यात आली. योजनेअंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली असून सर्वात मोठ्या आकारमानाचे शेततळे ३० बाय ३० बाय ३ मीटरचे असून त्यासाठी केवळ ५० हजार रुपये कमाल अनुदान दिले जात आहे. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. एकूणच या सर्व अटींमुळे शेतकºयांकडून मागेल त्याला शेततळे योजनेस प्रतिसाद मिळणे अशक्य ठरत आहे. पर्यायाने दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेले १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट अद्याप पूर्ण झालेले नाही.
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून ज्या शेतकºयांना शेततळे घेण्याची इच्छा आहे, त्यांना आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा. काही अडचण आल्यास कृषी सहायक, मंडळ अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
- दत्तात्रय गावसाने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम