वाशिम जिल्हा : शेतीपयोगी अवजारांसाठी ४१०० लाभार्थींचे अर्ज प्राप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 18:36 IST2018-02-07T18:33:06+5:302018-02-07T18:36:04+5:30
वाशिम : ‘उन्नत शेती, समृध्द शेतकरी’ या अभियानांतर्गत तथा कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत जिल्ह्यात ट्रॅक्टरसाठी १९८० व इतर अवजारांसाठी २१३० यानुसार ४११० लाभधारकांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.

वाशिम जिल्हा : शेतीपयोगी अवजारांसाठी ४१०० लाभार्थींचे अर्ज प्राप्त!
वाशिम : ‘उन्नत शेती, समृध्द शेतकरी’ या अभियानांतर्गत तथा कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत जिल्ह्यात ट्रॅक्टरसाठी १९८० व इतर अवजारांसाठी २१३० यानुसार ४११० लाभधारकांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. शासनाच्या सुचनेनुसार संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून निवडपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. आपल्या गावाच्या कृषि सहायकाकडे निवडपत्र देण्यात आलेले असून अर्ज केलेल्या लाभधारकांपैकी कोणाला निवडपत्र मिळाले नसल्यास, त्यांनी ते संपर्क साधून प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
निवडपत्र प्राप्त झाल्यानंतर लाभधारकांनी ट्रॅक्टर, अवजारे घेण्यासाठी पूर्वसंमती मिळण्यासाठी सातबारा, आठ-अ, अवजाराचे कोटेशन, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, अवजाराचा तपासणी अहवाल तालुका कृषि अधिकारी कार्यालयात दहा दिवसाच्या आत अर्जासह सादर करावे. जे लाभधारक निवडपत्र दिल्यापासून दहा दिवसांच्या आत सर्व कागदपत्रासह पूर्वसंमती मिळण्यासाठीचा अर्ज सादर करतील, अशा लाभधारकांना प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार पुर्वसंमती देण्यात येईल. जे लाभधारक दहा दिवसाच्या आत पुर्वसंमतीसाठीचा प्रस्ताव सादर करणार नाहीत, अशा लाभधारकांचा प्रतीक्षा यादीतील अधिकार संपुष्टात येईल. सदर लाभधारकांना तद्नंतर पुर्वसंमती दिली जाणार नाही. पुर्वसंमती मिळालेल्या लाभधारकांना पुर्वसंमती मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत अवजाराच्या यादीतील शासनमान्य उत्पादकांचे ट्रॅक्टर, अवजार खरेदी करुन अनुदान मागणी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले.