शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ४0 टक्के शेत पडीक

By admin | Updated: December 23, 2015 02:33 IST

अल्पवृष्टीचा परिणाम ; उत्पादनावरही होणार परिणाम.

विवेक चांदूरकर / वाशिम: यावर्षी रब्बी हंगामावर अल्पवृष्टीचा भीषण परिणाम झाला असून, सरासरीच्या ६0 टक्केच पेरणी झाली आहे तर ४0 टक्के शेत पडीक आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायाची दाहकता निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना यावर्षी मोठय़ा नुकसानाचा सामना करावा लागणार आहे.जिल्हय़ात गत तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय पूर्णत: मोडकळीस आला आहे. गतवर्षी जिल्हय़ात सरासरीच्या ६९ टक्केच पाऊस झाला. तसेच यावर्षी सरासरीच्या ८३ टक्के पाऊस झाला. जिल्हय़ाचे सरासरी पर्जन्यमान ७९९ मिमी असून, यावर्षी केवळ ६६४ मिमी पाऊस झाला आहे. गत दोन वर्षात जिल्हय़ात जवळपास ५0 टक्के कमी पाऊस झिरपला. जमिनीमध्ये ओलावा राहिला नाही. यावर्षी खरीप हंगामातच शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आली. सोयाबीनच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त घट आली. काही शेतकर्‍यांना एकरी एक ते दोन क्विंटलच उत्पादन झाले. शेतकर्‍यांना रब्बी हंगामाकडून अपेक्षा होती; मात्र यावर्षी परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे जमिनीत ओल राहिली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी न करण्याचाच निर्णय घेतला असून, डिसेंबर महिना संपत आला तरी जिल्हय़ात केवळ ५१ हजार ७८८ हेक्टरवरच पेरणी करण्यात आली आहे. जिल्हय़ात यावर्षी कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामात ८९२७0 हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात ५१७८८ हेक्टरवरच पेरणी करण्यात आली, तर ३७ हजार ४८२ हेक्टर क्षेत्र पडीक आहे. यावरून जिल्हय़ातील कृषी व्यवसायाची झालेली दैना निदर्शनास येते. जिल्हय़ात रब्बी हंगामातील हरभरा हे मुख्य पीक असून, ६५0६0 हेक्टरवर नियोजन करण्यात होते, त्यापैकी केवळ ४0 हजार ५८१ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तसेच गव्हाचे २१ हजार ३६0 हेक्टरवर नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ९९९२ हेक्टरवरच पेरणी करण्यात आली.