वाशिम: धानोरा येथे ग्राम देवता महोत्सवानिमित्त रंगभरण स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 14:59 IST2018-01-20T14:56:25+5:302018-01-20T14:59:02+5:30
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा येथे दरवर्षी ग्रामदेवता महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवारपासून या महोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

वाशिम: धानोरा येथे ग्राम देवता महोत्सवानिमित्त रंगभरण स्पर्धा
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा येथे दरवर्षी ग्रामदेवता महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवारपासून या महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या उत्सवानिमित्त धानोरकर आदर्श माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात रंगभरण स्पर्धा आणि शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन 19 जानेवारीला करण्यात आले होते. या स्पर्धांत विद्यालयातील ५ ते १२ वीपर्यंतच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
धानोरकर आदर्श विद्यालयात दरवर्षी ग्राम देवता महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यंदा या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रंगभरण आणि शुद्धलेखन स्पर्धा घेण्यात आली. रंगभरण स्पर्धा शिक्षक जी. एस. सावके यांच्या मार्गदर्शनात, तर शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन शिक्षक वैभव धाणोरकर, तसेच झळके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून शिक्षक अनिल कराळे, ढेंगळे, गुलाब उचित, सावके, झनके, पाटिल, विक्रम भगत आणि वैभव धानोरकर यांच्यासह शिक्षिका जिरवणकर आणि होले यांनी मुख्याध्यापक मंगेश धानोरकर यांच्या मार्गदर्शनात सहकार्य केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.