Washim: घरी जावून झोप म्हणताच महिलेच्या डोक्यात मारला दगड, आरोपीवर गुन्हा दाखल
By संतोष वानखडे | Updated: September 2, 2023 16:39 IST2023-09-02T16:39:37+5:302023-09-02T16:39:44+5:30
Washim Crime: घराच्या ओट्यावर महिला गप्पागोष्टी करीत असताना, जोरात बोलू नका, मला झोपू द्या असे एका इसमाने म्हटले. त्यावर घरी जावून झोप असे म्हणताच आरोपीने महिलेच्या डोक्यात दगड मारल्याची घटना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे १ सप्टेंबरच्या रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली.

Washim: घरी जावून झोप म्हणताच महिलेच्या डोक्यात मारला दगड, आरोपीवर गुन्हा दाखल
- संतोष वानखडे
वाशिम - घराच्या ओट्यावर महिला गप्पागोष्टी करीत असताना, जोरात बोलू नका, मला झोपू द्या असे एका इसमाने म्हटले. त्यावर घरी जावून झोप असे म्हणताच आरोपीने महिलेच्या डोक्यात दगड मारल्याची घटना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे १ सप्टेंबरच्या रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी प्राप्त तक्रारीनुसार मानोरा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.
शारदा सुभाष जाधव (३२) रा. इंझोरी यांच्या फिर्यादीनुसार, त्या आपल्या घराचे ओट्यावर इतर महिलांसोबत गप्पागोष्टी करीत होत्या. आरोपी निखिल धनराज हळदे हा जवळच असलेल्या आसरा माता मंदिरावरून तेथे आला व जोरात बोलू नका, मला झोपू द्या, असे म्हणाला. फिर्यादीने घरी जाऊन झोप असे म्हणताच आरोपीने दगड घेऊन डोक्यात मारला व जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२४, ५०४ भा.दं.वी.नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुनील नेमाने करीत आहेत.