जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रयोगशाळेसाठी निधीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:18 PM2020-03-13T12:18:25+5:302020-03-13T12:18:37+5:30

प्रयोगशाळा आणि ग्रंथालय उभारणीसाठी तीन महिन्यांपूर्वी निधीचा प्रस्ताव शासनस्तराकडे सादर केला.

Waiting for laboratory funding at the Zilla Parishad School | जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रयोगशाळेसाठी निधीची प्रतिक्षा

जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रयोगशाळेसाठी निधीची प्रतिक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेत फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नसतात, हा गैरसमज खोडून काढण्यासाठी शिक्षण विभाग सरसावला असून जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेत सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय उभारणीसाठी तीन महिन्यांपूर्वी निधीचा प्रस्ताव शासनस्तराकडे सादर केला. परंतू, अद्याप निधी मिळाला नसल्याने पुढील कार्यवाही थांबली आहे. 
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ प्राथमिक शाळा तर ५ कनिष्ठ महाविद्यालय अशा एकूण ७७८ शाळा आहेत. या शाळांमध्ये प्राप्त शासन निधीतून टप्प्याटप्प्याने भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. नाविण्यपूर्ण व अभिनव उपक्रम राबवून जिल्हा परिषदेच्या काही शाळांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. वाशिम जिल्हयाचा समावेश हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत असल्याने शिक्षण व आरोग्यावर विशेष भर दिला जात आहे. आकांक्षित जिल्हा म्हणून शासनाकडून भरीव स्वरुपात निधी मिळावा याकरीता शिक्षण विभागाने आराखडा तयार केला असून, त्याअनुषंगाने टप्प्याटप्प्याने निधी मिळाल्यास जिल्हा परिषद शाळांमध्ये बºयापैकी भौतिक सुविधा उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोड निर्माण व्हावी तसेच साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशातून जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये (जेथे आठवा वर्ग आहे अशा शाळा) विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करून पुढील मान्यतेसाठी वरिष्ठांकडे सादर केला आहे. प्रयोगशाळेमुळे केंद्र स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करणे शक्य होईल तसेच विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांना व्यासपिठ मिळेल, असा आशावाद शिक्षण विभाग बाळगून आहे. हा प्रस्ताव मंजूर होऊन निधी मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये प्रयोगशाळेचे स्वप्न साकारले जाणार आहे.
 
जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेत प्रयोगशाळा उभारली जावी, याकरीता प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठविला आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर प्रयोगशाळा साकारली जाणार आहे.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 
जिल्हा परिषद वाशिम.

Web Title: Waiting for laboratory funding at the Zilla Parishad School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.