वीज भारनियमनाविरोधात मुंगळावासी आंदोलनाच्या पवित्र्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 16:27 IST2018-11-11T16:27:33+5:302018-11-11T16:27:51+5:30
भारनियमन कमी करण्याच्या मागणीसाठी गाावकºयांनी १० नोव्हेंबरला कनिष्ठ अभियंता कार्यालयावर धडक देत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

वीज भारनियमनाविरोधात मुंगळावासी आंदोलनाच्या पवित्र्यात !
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंगळा (वाशिम) - मालेगाव तालुक्यातील चांडस फिडरवरून १२ तासांपेक्षा अधिक भारनियमन होत असल्याने मुंगळा येथील ग्रामस्थ त्रस्त झाले. दरम्यान, भारनियमन कमी करण्याच्या मागणीसाठी गाावकºयांनी १० नोव्हेंबरला कनिष्ठ अभियंता कार्यालयावर धडक देत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
चाडंस गावठाण फिडरवरून वीजपुरवठा असलेल्या गावांत १० आॅक्टोबरपासुन १२ तासांचे वीजभारनियमन घेतले जात आहे. याव्यतिरिक्त तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडीत राहतो. यामुळे गावकºयांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. पाणी असूनही वीजपुरवठ्याअभावी सिंचन करता येत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. याकडे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश मोहळे, ग्राम पंचायत सदस्य विलास राऊत, माळी युवा संघांचे तालुका अध्यक्ष विनोद राऊत, गजानन महाजन, रमेश भादुर्गे, भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रविण वायकर, प्रकाश राऊत, अनंता कुटे, सत्यनारायण राऊत, बंडू राऊत, सिद्धेश्वर केळे यांच्यासह ग्रामस्थांनी १० नोव्हेंबरला महावितरणच्या कनिष्ठ अभियंता कार्यालयावर धडक देत भारनियमन कमी करण्याची एकमुखी मागणी केली. तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करणे आणि भारनियमन कमी न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.