केशवनगर येथे ग्राम विकास आघाडीचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:41 AM2021-01-23T04:41:02+5:302021-01-23T04:41:02+5:30

रिसोड तालुक्यातील एकमेव औद्योगिक वसाहत असलेल्या केशवनगर ग्रामपंचायतचा फार मोठा नावलौकिक आहे. या ठिकाणी बाजारपेठ असल्याने परिसरातील १० ते ...

Victory of Village Development Front at Keshavnagar | केशवनगर येथे ग्राम विकास आघाडीचा विजय

केशवनगर येथे ग्राम विकास आघाडीचा विजय

Next

रिसोड तालुक्यातील एकमेव औद्योगिक वसाहत असलेल्या केशवनगर ग्रामपंचायतचा फार मोठा नावलौकिक आहे. या ठिकाणी बाजारपेठ असल्याने परिसरातील १० ते १२ खेड्यांची नाळ केशवनगर गावाशी जुळलेली आहे. त्यामुळे या गावातील राजकारणावर परिसरातील नागरिकांचे विशेष लक्ष असते. यावेळी ग्राम विकास आघाडीकडून विजयी उमेदवार म्हणून गजानन बाजड, ओम खोटे, छाया आखाडे, जरिता दळवी, कांताबाई मादळकर, मोहिनी डोंगरदिवे, त्रिवेणी पुरी यांना केशवनगर येथील जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले . सातही उमेदवार एकाच गटाचे निवडून आल्याने विकासकामे होण्याची जनतेला मोठी अपेक्षा आहे. कारण मागील ५ वर्षात पाहिजे तशी विकासकामे झाली नाहीत तसेच नागरिकांच्या वैयक्तिक कामांनाही मोठी खीळ बसली आहे. यावेळी अनुभवी ग्रामपंचायत सदस्यांचा विकासकामासाठी फार मोठा वाटा राहणार आहे, त्यामुळे एकदिलाने राहून विकास कामे व्हावे, हीच केशवनगर वासींयांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. (वा.प्र.)

Web Title: Victory of Village Development Front at Keshavnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.