Vehicles que up to one kilometer for sale of Soybean | सोयाबीन विक्रीसाठी एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग
सोयाबीन विक्रीसाठी एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : अवकाळी पाऊस थांबल्यानंतर सोयाबीच्या खरेदीला बाजार समित्यांत वेग आला आहे. त्यातच सोयाबीनला चांगले मिळत असल्याने मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. बाजार समितीत सोयाबीनच्या मोजणीसाठी नंबर लावण्यासाठी रात्री १२ वाजतापासूनच बाजार समितीच्या फाटकापासून तब्ब्ल एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागत असल्याचे दिसत आहे.
गेल्या महिनाभरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दानादान उडवली. शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच राहील्याने मोठ्या अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागला, त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हाती आलेले सोयाबीन ओले व काळे पडले; परंतु गेल्या पंधरा दिवसात वातावरणात बदल झाल्याने शेतकºया्ंनी सोयाबीन विक्रीची लगबग सुरू केली आहे. त्यामुळे बाजार समितीत मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मानोरा बाजार समितीत ताबडतोब पैशाचे व्यवहार होत असल्यामुळे बाहेरील या बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक होत असून, दररोज चार ते पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक या बाजारात होत असल्याचे चित्र दिसत आहे. बाजारात सोयाबीनची आवक वाढल्यामुळे मोजणीला विलंब लागत आहे. यासाठी अनेक शेतकरी आदल्या दिवशी रात्रीच बाजार समितीच्या फाटकासमोर रात्री १२ वाजता पासून आपलीवाहने उभी करीत आहेत. बाजार समितीत शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या गेटपासून ते विठोली रोडवर असलेल्या बुलडाणा अर्बनच्या गोडाऊनपर्यंत सोयाबीन वाहनाच्या रांगा पोचल्या होत्या. आलेल्या सोयाबीनचे मोजजाप रात्री उशिरापर्यंत चालु राहते. त्यामुळे परतीसाठी शेतकºयांवर मुक्काम करण्याची पाळी येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीनही मानोºयात

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. शासनाकडून सोयाबीनला ३७१० रुपये प्रति क्विंटलचे हमीभाव घोषीत करण्यात आले असताना बाजारात त्यापेक्षा अधिक दराने चांगल्या सोयाबीनची खरेदी होत आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा बाजार समितीतही ही स्थिती पाहायला मिळत असून, हा तालुका यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवरच असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, पुसद, आर्णि, दारव्हा आदि तालुक्यातील सोयाबीन उत्पादक मानोरा बाजार समितीत आपले सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणत आहेत. सोयाबीनच्या वाढत्या आवकीमुळे परिसरात दिवसरात्र रेलचेल पाहायला मिळत आहे.

Web Title: Vehicles que up to one kilometer for sale of Soybean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.