शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:49 IST

Vaccination of children शासकीय रुग्णालयांनी मात्र शंभर टक्के लसीकरण पूर्ण केल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : निरोगी आयुष्य जगता यावे, विविध प्रकारच्या आजारांपासून, विषाणूंपासून संरक्षण व्हावे, यासाठी मूल जन्माला आल्यापासून त्याचे वय १६ वर्षे होईपर्यंत टप्प्याटप्प्याने लसीकरण करावे लागते. कोरोना संकटामुळे मात्र २०२० या वर्षांत खासगी दवाखान्यांमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले आहे. शासकीय रुग्णालयांनी मात्र शंभर टक्के लसीकरण केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.मूल जन्माला आल्यानंतर लगेच क्षयरोग प्रतिबंधक (बी.सी.जी.) लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचली जाते. या लसीमुळे क्षयरोगापासून संरक्षण मिळते. बाळ दीड महिन्याचे झाल्यानंतर त्रिगुणी (ट्रिपल) लस टोचली जाते. या लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यापासून संरक्षण मिळते. या लसीसोबतच बाळास पोलिओ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस द्यावा लागतो. गोवर हा लहान वयात होणारा धोकादायक आजार असून, त्यासाठी गोवर प्रतिबंधक लस मूल ९ ते १२ महिन्यांचे असताना टोचली जाते. ६ महिने ते ३ वर्षे या वयात ‘अ’ जीवनसत्वाचा अभाव असतो. त्यामुळे या काळात ‘अ’ जीवनसत्वाचे डोस बाळाला पाजले जातात. त्याच्या दैनंदिन आहारात पपई, गाजर, हिरव्या पालेभाज्याही असाव्या लागतात. दरम्यान, वयाच्या ठरवून दिलेल्या टप्प्यांवर लसीकरण करणे आवश्यक असते; अन्यथा मूल निरनिराळ्या आजारांना बळी पडू शकण्याचा धोका असतो. असे असताना कोरोनाच्या संकटकाळात जन्मलेल्या व खासगी दवाखान्यांवर विसंबून राहणाऱ्या अनेक पालकांनी मुलांचे लसीकरण करून घेतलेले नाही. जिल्ह्यात हे प्रमाण ७० टक्क्यांच्या आसपास आहे. शासकीय रुग्णालयांनी मात्र शंभर टक्के लसीकरण पूर्ण केल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. २०१९ मध्ये लसीकरण पूर्ण२०१९ या वर्षांत जिल्ह्यात ५० हजारांपेक्षा लहान मुलांना सर्व प्रकारच्या लसी देण्यात आल्या होत्या. काेराेनामुळे २०२० मध्ये मात्र ते कमी झाल्याचे दिसून येत आहे.

मुलांची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहावी, यासाठी त्यांना जन्मापासून १६ वर्षे वयापर्यंत निरनिराळ्या प्रकारे लसीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना काळात मुलांचे लसीकरण केले नाही, त्यांनी  करून घ्यावे.- डॉ. राम बाजड, बालरोग तज्ज्ञ

मुलांची रोग प्रतिकारशक्ती चांगली नसल्यास त्यांना विविध स्वरूपातील आजार होऊ शकतात. त्यापासून संरक्षण होण्यासाठी ठरवून दिलेले लसीकरण अत्यावश्यक आहे. - डॉ. हरीश बाहेती, बालरोग तज्ज्ञ.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य