शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका

By admin | Updated: February 12, 2015 00:50 IST

शेतकरी हवालदिल शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान.

कारंजा लाड (वाशिम) : वादळी वारा व अवकाळी पावसाचा कारंजा व मानोरा तालुक्यातील रब्बी पीक व फळबागांना मंगळवारच्या मध्यरात्री पुन्हा फटका बसला. या नैसर्गिक प्रकोपात अनेक गावातील विद्युत पोल, झाडे जमिनीवर कोसळली, तर घरावरील टिनपत्रे उडून गेले. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.मंगळवारच्या मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तसेच काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा, भाजीपाला व फळबागांचे अतोनात नुकसान झाले. याशिवाय तालुक्यातील अनेक गावात रस्त्यावरील झाडे जन्मळून पडली. तसेच वीज वितरण कंपनीचे पोल वाकले, तर काहींच्या घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने प्रचंड धांदल उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, गायवळ, किनखेड येथे गारपीट झाली. ज्यामध्ये गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी, पपई, आंब्याचा बहर आदींचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे येथील नीता रजेश हवा यांच्या शेतातील ऊस, गहू, डाळिंब पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. २0१५ या वर्षाची सुरुवातही वादळी वारा व अवकाळी पावसाने झाली. १ जानेवारीला तालुक्यात अवकाळी पावसाने हैदोस घालून शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. आता फेब्रुवारी महिन्यातही हेच संकट शेतकर्‍यांवर दुसर्‍यांदा ओढवल्याने शेतकरी अतिशय हताश झाला आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.