नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 20:40 IST2021-01-01T20:40:41+5:302021-01-01T20:40:56+5:30
Accident News दुचाकीवरील ज्ञानदेव तुकाराम भोर (५५), रा. गोकसावंगी हे जागीच ठार झाले

नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
जऊळका रेल्वे: मार्गावरील चढाच्या दिशेने जाणारा कंटेनर तांत्रिक बिघाडामुळे परत वेगात खाली आल्याने मागून येणाºया दुचाकीला धडक बसून एक जण जागीच ठार, तर दुसरा जखमी झाल्याची घटना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत खिर्डा गावानजीक घडली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार सीजी ०४ डीसी ९१७५ क्रमांकाचा एक अवजड मालवाहू कंटेनर नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गाने जऊळका येथून मालेगावकडे जात होता. पुढे खिर्डागावानजीक मार्गावरील चढाच्या ठिकाणी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने कंटेनर पुढे जाण्याऐवजी वेगाने खाली आला. त्याचवेळी मागून येत असलेल्या एमएच ३७, यू ४०८४ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराला सावरण्यास वेळच मिळाला नाही. त्यामुळे कंटेनरची दुचाकीला धडक बसून, दुचाकीवरील ज्ञानदेव तुकाराम भोर (५५), रा. गोकसावंगी हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या सोबतचा दुसरा व्यक्ती जखमी झाला. जऊळका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून कंटेनर ताब्यात घेतल्याची माहिती ठाणेदार अजीनाथ मोरे यांनी दिली.