‘समृद्धी’वर म्यानमारचे दोघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 08:35 IST2025-10-19T08:35:37+5:302025-10-19T08:35:52+5:30
वाहन थेट रस्त्याच्या कडेला सुरक्षेखातर लावून असलेल्या टिनपत्र्यात जाऊन फसले.

‘समृद्धी’वर म्यानमारचे दोघे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क, वाशिम : जिल्ह्यातील डव्हा-जऊळका परिसरातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर १८ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात म्यानमारचे मिन ऑग आणि मिन चित ऑग हे दोन नागरिक जागीच ठार झाले; तर एक गंभीर आणि चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मुंबई येथून जगन्नाथपुरी येथे कारने दर्शनासाठी जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन थेट रस्त्याच्या कडेला सुरक्षेखातर लावून असलेल्या टिनपत्र्यात जाऊन फसले.