वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; १३ कोरोना ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 20:26 IST2021-01-03T20:25:57+5:302021-01-03T20:26:29+5:30
CoronaVirus in Washim आणखी दोघांचा मृत्यू झाला, तर आणखी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; १३ कोरोना ‘पॉझिटिव्ह’
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात रविवार ३ जानेवारी रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाला, तर आणखी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण बाधितांची संख्या ६,७०२ वर पोहोचली आहे.
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्याचे तीन दिवसाच्या अहवालावरून तूर्तास दिसून येते. रविवारी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील अकोला रोड परिसरातील १, शिव चौक येथील १, पाटणी चौक १, अनसिंग येथील १, रिसोड तालुक्यातील येवता येथील १, वरुड तोफा येथील १, मंगरुळपीर शहरातील सुपर कॉलनी परिसरातील १, अशोक नगर येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, कोठारी येथील १, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, पिंप्री मोडक येथील १, चांदई येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,७०२ वर पोहोचला आहे. रविवारी आठ जणांना रुग्णालयातून सुटी झाली.