Two killed in truck accident | ट्रक अपघातात दोन जण ठार
ट्रक अपघातात दोन जण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) - मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील १० बांधकाम मजूरांना कामासाठी अमरावतीकडे घेऊन जाणाºया ट्रकचा शहा फाट्याजवळ अपघात होऊन दोन ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजतादरम्यान घडली. खड्डे चुकविण्याच्या नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. 
मानोरा तालुक्यातील ग्राम इंझोरी येथील १० बांधकाम मजूर हे अमरावती येथे बांधकामावर सेंटरींगचे काम करण्यासाठी जाणार होते. सदर मजूर हे एम. एच. ०४ इ.वाय. ३२२१ क्रमांकाच्या ट्रकने इंझोरी येथून अमरावतीकडे जात होते. दरम्यान, कारंजा तालुक्यातील शहा फाट्याजवळ खड्डे चुकविण्याच्या नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला ट्रक  उलटला. यामध्ये दोन जण जागीच ठार तर ८ जण जखमी  झाले. मारुती गोरे आणि सिदार्थ वरघट असे मृतकाचे नाव आहे. अन्य ८ जणांवर सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत.

Web Title: Two killed in truck accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.