शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

वाशिम जिल्ह्यात तीन अपघातात दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 2:55 PM

तीन अपघातात दोन जण ठार तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १५ व १६ आॅगस्ट रोजी वाशिम, आमगव्हाण व कारंजा येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात तीन अपघातात दोन जण ठार तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १५ व १६ आॅगस्ट रोजी वाशिम, आमगव्हाण व कारंजा येथे घडली. अंकित भंडारे रा. वाशिम, मनोज डंबाळे रा. मांडवा ता. दिग्रस असे मृतकाचे तर विवेक राजेंद्र मोडक रा. पिंप्री मोडक असे जखमीचे नाव आहे.वाशिम : समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात खासगी बसच्या मागील चाकात सापडून वाशिम येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा ते पोस्ट आॅफिस चौक या दरम्यान १६ आॅगस्ट रोजी सकाळी ८.४० वाजताच्या सुमारास घडली. शहरातील नालंदा नगरातील अंकित भंडारे (२२) हा दुचाकीने जात असताना खासगी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तो खासगी बसच्या मागील चाकात सापडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या आवारात खासगी बस उभी केली असून, पुढील तपास वाशिम पोलीस करीत आहेत.बसने दुचाकीस्वारास उडविलेमानोरा : मानोरा - मंगरुळपीर मार्गावरील आमगव्हाणनजीक १५ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान महामंडळाच्या बसने विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने मनोज रामभाऊ डंबाळे हे जागीच ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला. मनोज रामभाऊ डंबाळे रा.मांडवा ता.दिग्रस हे सावरगाव कान्होबा येथे एच.एच.३७ एच.४०२९ क्रमांकाच्या दुचाकीने देवदर्शनाला जात असतांना विरुध्द दिशेने येणाºया एम.एच.०७ सी ९२८१ क्रमांकाच्या बसच्या चालकाने जबर धडक दिल्याने मनोज डंबाळे हे जागीच ठार झाले तर त्यांचे सोबत असलेले सुधाकर डांबरे हे किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी सुधाकर डांबरे यांच्या तक्रारीवरुन बस चालकाविरुध्द कलम २७९, ३३४, ३०४, भादंवीनुसार गुन्हा दाखल करुन सदर बस मानोरा पोलिस स्टेशनच्या आवारात लावण्यात आली. या प्रकरणाचा तपास बिट जमादार प्रकाश भगत करीत आहेत.

दुचाकीस्वार गंभीर जखमीकारंजा लाड : अज्ञात वाहनाने दुचाकीस मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना कारंजा ते मुर्तिजापूर मार्गावरील कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळ १४ आॅगस्ट रोजी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली. विवेक राजेंद्र मोडक रा. पिंप्री मोडक (३४) असे जखमीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सर्वधर्म आपतकालीन संस्थेचे श्याम सवाई, सुमेद बागडे व सुनील हिंगणकार यांनी घटनास्थळी गाठून प्राथमिक उपचारासाठी जखमीला कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जखमीला अमरावती येथे पाठविण्यात आले. दरम्यान वृत्तलिहेस्तोवर घटनेची पोलिसात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात