मांगूळ-झनक येथे दोन गटात हाणामारी; तीन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 16:02 IST2019-03-10T16:02:26+5:302019-03-10T16:02:34+5:30
शिरपूर जैन (वाशिम) - मांगुळझनक ता. रिसोड येथे सांडपाण्याच्या नालीवरुन १० मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली असून, या घटनेत ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मांगूळ-झनक येथे दोन गटात हाणामारी; तीन जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) - मांगुळझनक ता. रिसोड येथे सांडपाण्याच्या नालीवरुन १० मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली असून, या घटनेत ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया मांगुळ झनक येथे १० मार्च रोजी सकाळच्या सुमारास सांडपाणी वाहून नेणाºया नालीवरून सातपुते यांच्या भावकीत वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेत शोभा केशव सातपुते या महिलेच्या डोक्यावर कुºहाडीने वार करण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली. राजु केशव सातपुते, गजानन केशव सातपुते यांनाही मारहाण करण्यात आली. जखमीवर शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारासाठी त्यांना मालेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. परस्परविरोधी तक्रारीवरून याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.