दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोनजण गंभीर
By सुनील काकडे | Updated: February 9, 2024 17:02 IST2024-02-09T17:01:33+5:302024-02-09T17:02:14+5:30
कारंजा-पिंजर मार्गावरील घटना.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोनजण गंभीर
सुनील काकडे, वाशिम : दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर जबर धडक होऊन घडलेल्या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कारंजा-पिंजर मार्गावरील शिवनगर गावानजिक घडली. पुष्पक राठोड व अशोक पवार अशी जखमींची नावे आहेत.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, जखमींपैकी एक जण दुचाकी वाहनाने कारंजा येथून अकोला येथे जात होता.
मार्गातील अपघातस्थळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने त्यास जबर धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. तशा अवस्थेत त्यांना जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिकेचे रुग्णचालक नितीन मानकर यांनी उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बाहेरगावी जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला.