शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न - संजय जोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 18:49 IST

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रातील कामकाज प्रभावित होत आहे. यामधून अंगणवाडी केंद्रही सुटू शकले नाहीत. अंगणवाडी केंद्र बंद असल्याने बालकांचा पोषण आहार, ‘पोषण माह’ या उपक्रमात आरोग्यविषयक जनजागृती, अतितिव्र गटातील कुपोषित बालके, अंगणवाडी केंद्रातील कामकाज आदीसंदर्भात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद. बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात किती कुपोषित बालके आहेत आणि त्यांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना आहेत?जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, अतितिव्र कुपोषित गटात जवळपास ९६ बालके आहेत. या बालकांना कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी विशेष पोषण आहार पुरविण्यात येतो. पोषण माह या उपक्रमात कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यांची नियमित आरोग्य तपासणी करून दोन महिन्यापर्यंत या बालकांवर विशेष लक्ष ठेवून ते कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर कसे पडतील, याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘पोषण माह’निमित्त कोणत्या उपक्रमावर भर देण्यात येत आहे?पोषण माहनिमित्त कोणते कार्यक्रम, उपक्रम कोणत्या दिवशी घ्यावे, याचे निश्चित वेळापत्रक तयार करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून आरोग्य विषयक जनजागृती केली जात आहे. बालकांच्या बौद्धिक, शारीरिक व व्यक्तिमत्व विकासासाठी कोणते घटक महत्वपूर्ण आहेत, पालकांची कोणती दक्षता घ्यावी याबाबत माहिती देण्यात येत आहे.

पोषण आहार प्रत्येक बालकापर्यंत पोहचत नाही, असे म्हटले जाते. याबाबत आपण काय सांगाल?कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या पुढील आदेशापर्यंत अंगणवाडीतील शिक्षण प्रक्रिया सध्या बंद आहे. त्यामुळे बालकांना पोषण आहारासाठी दोन महिन्याचे धान्य घरपोच किंवा अंगणवाडी केंद्रात दिले जाते. सर्वच बालकांना पोषण आहारासाठी प्रस्तावित व नियोजित अन्नधान्याचे वाटप करण्यात येते.

सध्या अंगणवाडी केंद्रातील कामकाज कसे सुरू आहे?कोरोनामुळे सध्या अंगणवाडी शिक्षण पद्धती बंद आहे. परंतू, आवश्यक ती खबरदारी घेऊन बालकांचे वजन, मोजमाप घेणे, पोषण आहार, आरोग्यविषयक जनजागृती आदी उपक्रम सुरू आहेत. पोषण माहनिमित्त वैयक्तिक स्वच्छता, स्तनदा माता व कुपोषित बालकांच्या मातांची सभा घेऊन मार्गदर्शन करणे, अंगणवाडी केंद्रांतर्गत येणाºया सर्व गर्भवती, ० ते ६ वर्र्षे वयोगटातील बालकांची वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांमार्फत वजन व उंचीचे मोजमाप, पोषण घटकांची कमतरता आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून जनजागृती सुरू आहे. माता, पालकांनीदेखील आरोग्याची काळजी घ्यावी.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत