वाशिम जिल्ह्यातील कुकसा फाट्याजवळ ट्रक उलटला; एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 19:30 IST2017-12-10T19:23:32+5:302017-12-10T19:30:06+5:30
शिरपूर जैन (वाशिम ): मालेगाव ते मेहकर मार्गावरील कुकसा फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटुन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. ही घटना ९ डिसेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान घडली.

वाशिम जिल्ह्यातील कुकसा फाट्याजवळ ट्रक उलटला; एक ठार, दोन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम ): मालेगाव ते मेहकर मार्गावरील कुकसा फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटुन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. ही घटना ९ डिसेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान घडली.
मालेगाव ते मेहकर या महामार्गावरून हिरवी मिरची घेवुन एम.एच.२१ एक्स ९५६२ क्रमांकाचा ट्रक ९ डिसेंबरला मध्यरात्रीदरम्यान मालेगावहून मेहकरकडे जात होता. दरम्यान कुकसा फाट्याच्या जवळपास एका वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली उतरून उलटला. यामध्ये क्लिनर अनिल मधुकर पवार (२२) रा .कन्यानगर जालना हा गंभीर जखमी तर दुसरा क्लिनर बंटी नारायण रंधवे, रा. कन्यानगर जालना व चालक रामेश्वर एकनाथ ढगे (३७), दिमणी वायगाव ता.जि. औरंगाबाद हे जखमी झाले. कुकसा येथील काही ग्रामस्थांनी रात्री २ वाजताच्या सुमारास रूग्णवाहिकेद्वारे जखमींना उपचारार्थ मेहकर येथे हलविले. येथे डॉक्टरांनी अनिल मधुकर पवार याला मृत घोषित केले तर अन्य जखमींवर उपचार सुरू केले. दरम्यान, चालक ढगे हा येथून सोयीस्कररित्या फरार झाला. याप्रकरणी शिरपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.