अकोला-वाशिम महामार्गावरील पुलावरून ट्रक कोसळला; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:11 IST2020-07-27T16:08:14+5:302020-07-27T16:11:16+5:30

संतोष राजू पाटिल (२३) व धर्मेंद्र गेंदालाल राठोड (३०), अशी मृतकांची नावे आहेत.

Truck crashes off bridge on Akola-Washim National Highway; Two killed | अकोला-वाशिम महामार्गावरील पुलावरून ट्रक कोसळला; दोन ठार

अकोला-वाशिम महामार्गावरील पुलावरून ट्रक कोसळला; दोन ठार

कमत न्युज नेटवर्क मेडशी (वाशिम): अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून एक ट्रक उलटून दोन जण ठार झाल्याची घटना २७ जुलै सोमवार रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मेडशीनजीक घडली. संतोष राजू पाटिल (२३) व धर्मेंद्र गेंदालाल राठोड (३०), अशी मृतकांची नावे आहेत. मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मध्यप्रदेशातील इंदोर येथून आलेला एमपी-०९ एचएफ ६६४६ क्रमांकाचा मालवाहू ट्रक आंध्रप्रदेशातील चेन्नईकडे जाता होता. अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर पातूर येथून मालेगावकडे जाणाºया रस्त्यावरील पुलाजवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक पुलावरून खाली कोसळला. या अपघातात ट्रक क्लीनर संतोष राजू पाटिल (२३) व ट्रक चालक धर्मेंद्र गेंदालाल राठोड (३०) हे दोघे ट्रकखाली दबले. मेडशी येथील पाईप फॅक्टरीच्या कामावर जात असलेले शेख नय्यूम बागवान यांना हा अपघात दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस कर्मचारी दत्तात्रय सुरोशे ,विलास गायकवाड सुरेंद्र तिखिले आदिंनी घटनास्थळावर पोहोचत ट्रकखाली दबलेल्या दोघांना बाहेर काढले; परंतु त्यांचे प्राण वाचू शकले नाही. या प्रकरणी मालेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Truck crashes off bridge on Akola-Washim National Highway; Two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.