माजी सैनिकांकडून शौर्य स्तंभाला मानवंदना

By संतोष वानखडे | Published: January 1, 2024 07:24 PM2024-01-01T19:24:14+5:302024-01-01T19:24:32+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त ऑनररी कॅप्टन विलास वानखडे होते.

Tributes to Shaurya Pillar by ex-servicemen | माजी सैनिकांकडून शौर्य स्तंभाला मानवंदना

माजी सैनिकांकडून शौर्य स्तंभाला मानवंदना

 वाशिम : भिमा कोरेगाव शौर्यदिन विजयस्तंभ अभिवादन सोहळा १ जानेवारी रोजी वाशिम येथे पार पडला असून, माजी सैनिकांनी शौर्य स्तंभाला मानवंदना दिली.

नालंदा नगर वाशिम येथील महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर साकारलेल्या विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना, सैनिक सलामी  देण्याचा एक दिवशीय कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त ऑनररी कॅप्टन विलास वानखडे होते. यावेळी सेवानिवृत्त ऑनररी कॅप्टन साईदास वानखेडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव आटोटे गुरुजी, डॉ.सिद्धार्थ देवळे, प्रतिभाताई सोनोने, ॲड.डाॅ. मोहन गवई , डॉ. तुषार गायकवाड, डॉ. नरेशकुमार इंगळे, तेजराव वानखेडे, दौलतराव हिवराळे, परमेश्वर अंभोरे, शेषराव ढोके, अनंतकुमार जुमडे, रमेश गरपाल, मेघा डोंगरे-मनवर, आम्रपाली अनिल ताजने, अनिल ताजणे, गौतम भालेराव, गौतम सोनुने, संजू आधार वाढे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

सुरुवातीलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाशिम शहरातील आजी माजी सैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना दिली. तेथून मोटारसायकल रॅली नालंदा नगरकडे मार्गस्थ झाली. नालंदा नगर येथील मैदानात भीमा कोरेगाव येथे शहिद झालेल्या सैनिकांच्या  विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला आजी व माजी सैनिकांनी पुष्पचक्र वाहुन मानवंदना दिली. यावेळी सुरुवातीला बौध्द वंदना घेण्यात आली. यावेळी शौर्य दिन उत्सव समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त नायब सुभेदार दीपक ढोले, उपाध्यक्ष सेवानिवृत्त हवालदार आनंदा ताजने, सचिव सेवानिवृत्त हवालदार काशिनाथ भिसे यांनी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मुकुंद वानखडे यांनी तर आभार दिलीप गवई यांनी मानले. कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायांसह आजी-माजी सैनिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
 

Web Title: Tributes to Shaurya Pillar by ex-servicemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम