शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीबहुल पिंपळवाडी गावात शौचालय बांधकामाचे वारे!

By admin | Updated: February 24, 2015 00:29 IST

महिला पदाधिकारी सरसावल्या; ८५ टक्के शौचालयाचे काम युद्धपातळीवर सुरू.

अमोल कल्याणकर / मालेगाव (जि. वाशिम):आदिवासी व बंजाराबहुल असलेल्या पिंपळवाडीत महिलांनी महिलांमध्ये जनजागृती केल्याचे चांगले परिणाम आता दृष्टिपथात येत आहेत. १५0 कुटुंब असलेल्या या गावात १२५ शौचालयांचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.हगणदरीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेले निर्मल भारत अभियान वाशिम जिल्ह्यातही राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य देण्याची अट टाकण्यात आली आहे. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्वच्छता अभियान कक्षाच्यावतीने घरोघरी शौचालय बांधकाम करण्याचा नारा दिला जात आहे. आदिवासी व बंजाराबहुल असलेल्या मालेगाव तालुक्यातील पिंपळवाडी येथे सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशा तिनही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यपदाची धुरा महिलांच्या हाती आहे. सरपंच आशाबाई देवीसिंग पवार, जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभा घुगे व पंचायत समिती सदस्या अन्नपुर्णा भुरकाडे यांनी पिंपळवाडीत शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद स्वच्छता कक्षाचे राम श्रृंगारे व टीम आणि मालेगाव कक्षाचे तालुका समन्वयक गौतम कंकाळ, गट समन्वयक सदानंद राऊत आदींनी शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन दिले. १५0 कुटुंब असलेल्या पिंपळवाडीत दीड महिन्यापूर्वी केवळ तीन शौचालय होते. दीड महिन्यातच चित्र पालटले असून, आता १२५ शौचालयांचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. आता केवळ २२ शौचालयांचे बांधकाम बाकी आहे. लवकरच या २२ कुटुंबांच्या घरीदेखील शौचालय बांधकामाचा श्रीगणेशा केला जाईल, असा विश्‍वास सरपंच आशाबाई देवीसिंग पवार यांनी व्यक्त केला.