वाशिम जिल्ह्यातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 16:14 IST2018-07-21T16:13:02+5:302018-07-21T16:14:28+5:30

वाशिम : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागांसह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत नऊ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय तथा विनंतीवरून बदल्या करून त्यांना नव्याने नेमणूका देण्यात आल्या.

Transfers of nine police officers in Washim district | वाशिम जिल्ह्यातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

वाशिम जिल्ह्यातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठळक मुद्देवाशिम पोलिस स्टेशनच्या नियंत्रण कक्षात कार्यरत पोलिस निरीक्षक पितांबर जाधव यांना मालेगावच्या निरीक्षकपदी बदली देण्यात आली. पोलिस निरीक्षक बबन कºहाळे यांच्याकडे आता ‘टी.एम.सी.’ कक्षाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. मंगरूळपीर पोलिस स्टेशनचे विद्यमान पोलिस निरीक्षक रमेश जायभाये यांना १ वर्षे मुदतवाढ दिली.

वाशिम : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागांसह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत नऊ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय तथा विनंतीवरून बदल्या करून त्यांना नव्याने नेमणूका देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शनिवार, २१ जुलै रोजी कळविली.
बदल्या झालेल्या अधिकाºयांमध्ये वाशिम पोलिस स्टेशनच्या नियंत्रण कक्षात कार्यरत पोलिस निरीक्षक पितांबर जाधव यांना मालेगावच्या निरीक्षकपदी बदली देण्यात आली. मालेगावचे पोलिस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांना शिरपूर पोलिस स्टेशन, वाशिम नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक बाबुसिंग राठोड यांना अनसिंग पोलिस स्टेशन, सायबर/नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक धृवास बावनकर यांना मानोरा पोलिस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रकाश डुकरे यांना पोलिस नियंत्रण कक्ष संलग्न, पोलिस कल्याण शाखेतील पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांना स्थानिक गुन्हे शाखा व कल्याण शाखेचा अतिरिक्त कार्यभार, पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक अनिल ठाकरे यांना सायबर कक्ष; तर पोलिस निरीक्षक बबन कºहाळे यांच्याकडे आता ‘टी.एम.सी.’ कक्षाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. तसेच मंगरूळपीर पोलिस स्टेशनचे विद्यमान पोलिस निरीक्षक रमेश जायभाये यांना १ वर्षे मुदतवाढ दिली जात असल्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी कळविले.

Web Title: Transfers of nine police officers in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.