शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 18:30 IST2019-05-24T18:30:13+5:302019-05-24T18:30:22+5:30
वाशिम : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी याद्या तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता २६ मेपर्यंत शिक्षकांच्या आक्षेपांची पडताळणी करण्यात येणार आहे

शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया लांबणीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी याद्या तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता २६ मेपर्यंत शिक्षकांच्या आक्षेपांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच आॅनलाईन अर्ज सादर करण्याच्या सुचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी लांबणीवर पडली आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया २०१९ साठी अवघड, सर्व साधारण क्षेत्र, महिलासाठी अवघड क्षेत्र, बदलीपात्र शिक्षकांची शाळा निहाय यादी तसेच समाविक रणासह इतर याद्या तयार करण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत. उपरोक्त प्रक्रिया २० मे पर्यंत पुर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांच्यावतीने पंचायत समिती स्तरावर देण्यात आले होते. आता शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर याबाबत शिक्षकांच्या आक्षेपांची २६ मेपर्यंत पडताळणी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शिक्षकांना आॅनलाईन अर्ज सादर करण्याच्या तारखेबाबत कळविण्यात येणार आहे. दरम्यान, शिक्षकांच्या बदलीसंदर्भात २३ मुद्यांना अनुसरून मुख्याध्यापकांकडून मागविण्यात आलेल्या याद्यातून जिल्हा परिषदस्तरावर शिक्षकांची यादी तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला आणखी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.