जिल्ह्यातील २२९२ युवकांना दिले जाणार प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST2021-06-04T04:31:34+5:302021-06-04T04:31:34+5:30
जिल्ह्यात आरोग्याशी संबंधित सेवा देताना खासगी डॉक्टरांकडे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून ...

जिल्ह्यातील २२९२ युवकांना दिले जाणार प्रशिक्षण
जिल्ह्यात आरोग्याशी संबंधित सेवा देताना खासगी डॉक्टरांकडे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून उपलब्ध होणार आहे. या अनुषंगाने २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अविनाश आहेर आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या साहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांच्या प्रमुख उपस्थितीत खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी डॉ. राठोड म्हणाले, खासगी रुग्णालयांना ज्या क्षेत्रासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणातून खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी तसेच प्रशिक्षण घेण्यास इच्छुक युवक-युवतींमुळे कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ मिळण्यास या कार्यक्रमाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.