शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ‘प्रशिक्षण’ बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 15:39 IST

वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील तसेच अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे बंधनकारक असून, प्रशिक्षणाची रुपरेषाही शिक्षण विभागाने नव्याने स्पष्ट केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील तसेच अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे बंधनकारक असून, प्रशिक्षणाची रुपरेषाही शिक्षण विभागाने नव्याने स्पष्ट केली आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम, २००९ नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे असून, हे शिक्षण देण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे शिक्षकही अधिक चांगल्याप्रकारे प्रशिक्षित होण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणमार्फत विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जातात. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी लागू करण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या सुधारीत कार्यपद्धतीस शिक्षण विभागाने २१ डिसेंबरच्या आदेशान्वये मान्यता दिलेली आहे. वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी प्रशिक्षणांचा कालावधीही निश्चित करण्यात आलेला आहे. प्राथमिक शिक्षकांसाठी भाषा (मुलभूत क्षमता वाचन कार्यक्रम), गणित संबोधन विकासन, तेजस प्रशिक्षण तर माध्यमिक शिक्षकांसाठी अविरत-१, चेस, आयआयटीचे गणित प्रशिक्षण आणि न्यासचे विज्ञान प्रशिक्षण आवश्यक आहे. राज्य मंडळ पूणे यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पर्यंत ज्या शिक्षकांनी सेवांतर्गत प्रशिक्षणे घेतली आहेत व समाधानकारकरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत, अशा शिक्षकांचे प्रशिक्षण वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत.सन २०१८-१९ या वर्षापासून वरिष्ठश्रेणीकरीता (१२ वर्षे) १० दिवसांचे प्रशिक्षण व निवड वेतन श्रेणीकरीता (२४ वर्षे) प्रत्येक वर्षी १० दिवसांचे प्रशिक्षण याप्रमाणे सलग ४ वर्षात ४० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर १० दिवसांचे प्रशिक्षण हे शिक्षकांना ज्या वर्षात १२ वर्षे पूर्ण होणार आहेत; त्यापूर्वीच्या कोणत्याही ३ पैकी २ वर्षात पूर्ण केलेली असावी तसेच ४० दिवसांचे प्रशिक्षण हे शिक्षकांना ज्या वर्षी २४ वर्षे पूर्ण होणार आहेत; त्यापूर्वीच्या ५ वर्षांपूर्वी ४ वर्षात पूर्ण करणे आवश्यक आहे.

 स्वतंत्र प्रशिक्षणाला मनाईकेवळ वरिष्ठ अथवा निवड वेतन श्रेणीसाठी विद्या प्राधिकरणातर्फे अथवा राज्य मंडळातर्फे यापुढे वेगळ्याने अथवा स्वतंत्र प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे शिक्षण विभागाने शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (विद्या प्राधिकरण) प्रत्येक वर्षी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतील, या प्रशिक्षणांचा एकत्रितरित्या कालावधी पूर्ण केल्यास सदर प्रशिक्षणे ही वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक