विद्यार्थ्यांना दिले जातेय ‘सीडबॉल’ तयार करण्याचे प्रशिक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 16:28 IST2019-07-14T16:27:42+5:302019-07-14T16:28:02+5:30
मी वाशिमकर ग्रूपद्वारे वाशिमला ‘ग्रीन सीटी’ बनविण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण मोहिम व सीड बॉल तयार करण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे.

विद्यार्थ्यांना दिले जातेय ‘सीडबॉल’ तयार करण्याचे प्रशिक्षण !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील मी वाशिमकर ग्रूपद्वारे वाशिमला ‘ग्रीन सीटी’ बनविण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण मोहिम व सीड बॉल तयार करण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे.शनिवार, १३ जुलै रोजी स्थानिक पोद्दार स्कूल येथे विद्यार्थ्यांना सिड बॉल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणाच्या वेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले. जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ६०० पेक्षा अधिक निंबोळीच्या सीड बॉल तयार करण्यात आल्या. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी वाशिमकर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सीड बॉल कसे तयार करावयाचे याचे प्रशिक्षण देण्यात आले.वाशिम येथील सर्व शाळांमध्ये सिड बॉल तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्याचे नियोजन असून, सदर उपक्रम टप्याटप्याने घेतला जावा, असे आवाहन मी वाशिमकर ग्रुपकडून करण्यात आले.