वाहतूक पोलीस रात्री उशिरापर्यंत राहणार चौकात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 03:22 PM2019-12-13T15:22:34+5:302019-12-13T15:22:41+5:30

लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात बदल करण्यात आला असून आता ते रात्री उशिरापर्यंत चौकात उभे राहणार आहेत.

Traffic police stay up late in the night! | वाहतूक पोलीस रात्री उशिरापर्यंत राहणार चौकात!

वाहतूक पोलीस रात्री उशिरापर्यंत राहणार चौकात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील वाहतुकीला वळण लागावे, वाहतूक प्रभावित होऊ नये याकरिता वाशिम शहर वाहतूक शाखा व नगरपरिषदेच्यावतिने मोहीम हाती घेण्यात आली. या मोहीमेंतर्गंत सर्वात गजबजलेला रस्ता दिवसभर मोकळा राहत होता, परंतु संध्याकाळी ६ वाजता शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची डयुटी संपली की, संपूर्ण रस्ता फेरीवाल्यांनी अडविला जात होता. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात बदल करण्यात आला असून आता ते रात्री उशिरापर्यंत चौकात उभे राहणार आहेत.
वाशिम शहरातील सर्वात गजबजलेल्या पाटणी चौक ते शिवाजी चौक दरम्यान होत असलेल्या अस्ताव्यस्त वाहतुकीला शहर वाहतूक शाखा, वाशिम नगरपरिषदेच्यावतिने वळण लावण्यात आले होते. सततच्या कारवाईने लघुव्यावसायिकांनी रस्त्यावर आपली दुकाने थाटणे बंद केले होते, परंतु गत दोन दिवसांपासून शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांचे कर्तव्य संपले की, रस्त्यावर बाजार भरण्यास सुरुवात होत आहे. यामुळे पुन्हा वाहतूक प्रभावित होण्याच्या प्रकारात वाढ झाली होती या संदर्भात ११ डिसेंबर रोजी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तांत पोलीस अधिक्षकांशी चर्चा करुन नियोजन करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. यावरुन शहर वाहतूक शाखा निरिक्षक राजू वाटाणे यांनी संबधितांशी चचौ करुन शहर वाहतूक शाखेच्या पाटणी चौकातील संध्याकाळी ६ वाजता संपत असणारे कर्तव्यात बदल करुन दोन शिफ्ट तयार केल्यात. आता पाटणी चौकामध्ये रात्री ९ वाजेपर्यंत शहर वाहतूक शाखा कर्मचारी कर्तव्य बजावून रस्त्यावर उभ्या राहणाºया वाहनांवर, फेरीवाल्यांवर कारवाई करुन याला रोख देण्यात येणार आहे. त्यामुळे आता संध्याकाळच्या अस्ताव्यस्त वाहतुकीपासूनही नागरिकांना मुक्तता मिळणार आहे.
 
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यात येत असतांना संध्याकाळी शहरातील रस्त्यावर उभी होत असलेल्या वाहनांमुळे कर्मचाºयांच्या दोन शिफ्ट करण्यात आल्या आहेत. आता पाटणी चौकात रात्री ९ वाजेपर्यंत कर्मचारी हजर राहणार आहेत.
- राजू वाटाणे, शहर वाहतूक शाखा निरिक्षक, वाशिम

 

Web Title: Traffic police stay up late in the night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.