ट्रॅक्ट उलटला; शेतमालाचे नुकसान

By Admin | Updated: May 24, 2014 01:18 IST2014-05-24T01:17:42+5:302014-05-24T01:18:55+5:30

किनखेडा मार्गावर शेतमालाचा ट्रॅक्टर उलटला व शेतमालाचे नुकसान झाले

The track overturned; Loss of farmland | ट्रॅक्ट उलटला; शेतमालाचे नुकसान

ट्रॅक्ट उलटला; शेतमालाचे नुकसान

किनखेडा : येथील मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे आज (दि.२३) रोजी सकाळी शेतमालाचा ट्रॅक्टर पलटी होवून डोंगरकिन्ही ता. मालेगाव येथील शेतकर्‍यांचा ट्रॅक्टर व शेतमालाचे नुकसान झाले.या घटनेने रिसोड-मालेगाव या प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली.सुदैवाने बाजूला असलेल्या रसवंतीजवळ सदर घटना घडली नाही अन्यथा जीवित हानी होण्याची शक्यता होती. डोंगरकिन्ही ता. मालेगाव येथील ट्रॅक्टर भुईमूग शेगाचा माल शेणगाव येथे नेत असताना किनखेडा येथील रस्त्यावरील खड्ड्यात टायर गेल्यामुळे ट्रॉली उलटला. शेतमालाचे नुकसान होवून ट्रॉलीचे सुद्धा नुकसान झाले. दरम्यान गावातच जेसीबी मशीन असल्यामुळे तीन तासात ट्रॅक्टर बाजूला काढण्यात आले.

Web Title: The track overturned; Loss of farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.