शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तूर उत्पादकांचा कल व्यापाऱ्यांकडे

By admin | Updated: April 16, 2017 20:25 IST

वाशिम- तूर खरेदी दरम्यान नाफेडच्यावतीने माल माजेणीसाठी विलंब होत आहे. परिणामी, तूर विकण्यासाठी शेतकरी वर्ग आता बाजार समित्यांमधील व्यापाºयांकडे वळले असल्याचे चित्र आहे.

नाफेडवर मोजणी होईना: बाजार समित्यांकडे तुरीची आवक वाढली वाशिम:  नाफेडच्यावतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या तुरीच्या खरेदीला आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली असली तरी, या ठिकाणी माल मोजणीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी आता बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांकडे आपला कल केला असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात यावर्षी तुरीचे विक्रमी उत्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये दररोज तुरीची आवक वाढली आहे. १२ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांकडे ४ लाख ५७  हजार ७५३ क्विंटल तर नाफेडकडे १ लाख ८२ हजार ६ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. बाजार समितीत तुरीला सरासरी किमान ४ हजार ९२ रुपए, तर कमाल ४ हजार ४५८ रूपयाचा  भाव मिळत आहे. जिल्ह्यात यावर्षी तुरीच्या उत्पन्नात वाढ झाल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून तुरीच्या भावात मोठी घसरण करण्यात आली. या भावात तुर परवडत नसल्याने कारण समोर करत तुर जादा दराने खरेदी करण्यास विरोध दर्शविला होता. शेतकर्‍यांची ओरड होत असल्याने शासनाने तुरीला पाच हजार पन्नास रूपयांचा हमीभाव देऊन नाफेड तुर खरेदी केंद्र सुरू केले होते. तुरीला जास्त भाव मिळत असल्याने नाफेड तुर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली. या ठिकाणी शेतकऱ्यांना तुरीची मोजणी करण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागत आहे. त्यातच नाफेडची खरेदी १५ एप्रिलपासून बंद करण्यात येणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर नाफेडवर आधीच हजारो क्विंटल माल पडून असल्याने अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. दरम्यान, कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी नाफेडच्या खरेदीला आणखी सात दिवसांची मुदत वाढ दिल्याची घोषणा शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना केली तरी, या ठिकाणी पूर्वीच पडून असलेला माल मोजला जाण्याची शक्यता नसल्याने शेतकरी नाफेडकडे माल देण्यास उत्सूक नसल्याचे दिसत आहे.