रुग्ण शोधण्यासाठी ‘स्पर्श’कुष्ठरोग जनजागृती मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:34 PM2020-01-31T12:34:49+5:302020-01-31T12:34:56+5:30

कुष्ठरूग्णांचा शोध घेण्यासाठी ३० जानेवारीपासून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा जिल्ह्यात थाटात प्रारंभ झाला.

'Touch' Leprosy Awareness Campaign to Find Patients | रुग्ण शोधण्यासाठी ‘स्पर्श’कुष्ठरोग जनजागृती मोहिम

रुग्ण शोधण्यासाठी ‘स्पर्श’कुष्ठरोग जनजागृती मोहिम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कुष्ठरूग्णांचा शोध घेण्यासाठी ३० जानेवारीपासून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा जिल्ह्यात थाटात प्रारंभ झाला. कुष्ठरोग निवारण दिनाच्या निमित्ताने ३० जानेवारी ते १३ फेबु्रवारी दरम्यान कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडा राबविला जाणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व सहायक शल्य चिकीत्सक डॉ. येलकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात झाली. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे या वर्षाचे घोषवाक्य ‘कृष्ठरोगाविरुध्द अखेरचे युध्द’ असे असून, या पंधरवड्यामध्ये व्यापक जनजागृती केली जाणार आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
शाळेमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग, क्षयरोग बाबत प्रतिज्ञाचे वाचन, शाळेतील फलकावर कुष्ठरोग व क्षयरोगाविषयी संदेश लिहिणे, शाळेमध्ये नाटक, प्रश्नमंजुषा, निबंध, चित्रकला, पथनाट्य, इत्यादी जनजागृती कार्यक्रम राबविणे, स्थानिक महिला मंडळे, बचत गट, तरुण मंडळे, यांच्या सभा, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा, बाजार, यात्रा इत्यादी गर्दीच्या ठिकाणी प्रदर्शन लावणे, आरोग्य मेळावे घेणे आदींवर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण किती कुष्ठरूग्ण आहेत, याचाही शोध या मोहिमेदरम्यान घेतला जाणार आहे. कुष्ठरूग्णांवर योग्य उपचार व्हावे याकरीता सदर मोहिम राबविण्यात येत आहे, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. यावेळी सहाय्यक संचालक कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनकुमार हाके, वैद्यकीय अधिकारी क्षयरोग डॉ. परमणकर यांच्यासह क्षयरोग कार्यालयाचे एन.एन.बढे, शेंडगे, लोणसुने, सोनुने, के.एल.कºहाडे, पी.एस.सदार, कºहळकर, किर्लोसकर, खंडारे इत्यादी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. संचालन एन.एन.बढे, तर आभार के.एस.कºहाडे यांनी मानले.

 

Web Title: 'Touch' Leprosy Awareness Campaign to Find Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम