ग्रंथदिंडीने दुमदुमली नगरी
By Admin | Updated: February 17, 2015 01:48 IST2015-02-17T01:48:14+5:302015-02-17T01:48:14+5:30
वाशिम येथे ग्रथोत्सवास सुरवात; बाल वारक-यांचा उत्स्फूर्त सहभाग.

ग्रंथदिंडीने दुमदुमली नगरी
वाशिम : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि ङ्म्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आप्पासाहेब सरनाईक सभागृहात आयोजित ग्रंथोत्सव कार्यक्रमानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथोत्सव दिंडी सोहळय़ाने नगरी दुमदुमून गेली
होती.
ग्रंथोत्सवानिमित्त राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय येथून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व्यंकटेश बावणे, सचिव माधव शेवलकर, ग्रंथपाल संतोष काळमुंदळे, काळे, नेहरू युवा केंद्राचे मदन घेघाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ग्रंथदिंडीमध्ये लॉयन्स विद्यानिकेतन, बाकलीवाल विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा व शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी व जिल्ह्यातील विविध कलापथकांचे कलाकार सहभागी झाले होते. यावेळी वारकरी वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी ह्यविठ्ठल विठ्ठलह्ण या गीतावर नृत्य सादर केले.
ग्रंथदिंडी यशस्वी करण्यासाठी ग्रंथोत्सव समन्वय समितीचे जनार्दन बोरकर, सुरेंद्र अधीर, मोहन शिरसाट, घुगे व राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.