काटा येथील डोहात बुडून चिमुकल्याचा मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 17:09 IST2018-06-24T17:07:31+5:302018-06-24T17:09:09+5:30

वाशिम :  तालुक्यातील काटा येथील वस्ती शाळेजवळील एका डोहाशेजारी खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा पाय घसरल्याने डोहात बुडून मृत्यू झाला.

three years old boy drowning in river | काटा येथील डोहात बुडून चिमुकल्याचा मृत्यू !

काटा येथील डोहात बुडून चिमुकल्याचा मृत्यू !

ठळक मुद्देही घटना २४ जुन रोजी दुपारच्या सुमारास घडली. शे. हसन यांचा तीन वर्षीय चिमुकला शे. अय्यान हा खेळत असताना डोहाच्या दिशेने गेला. पाय घसरल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  तालुक्यातील काटा येथील वस्ती शाळेजवळील एका डोहाशेजारी खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा पाय घसरल्याने डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना २४ जुन रोजी दुपारच्या सुमारास घडली. 
प्राप्त माहितीनुसार काटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जिल्हा परिषदेची उर्दु व वस्ती शाळा आहे. या शाळेच्या परिसरात मोठमोठे खड्डे आहेत. गेल्या तीन दिवसामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व खड्डे भरून गेले. शाळेच्या परिसरात वास्तव्य करणाºया शे. हसन यांचा तीन वर्षीय चिमुकला शे. अय्यान हा खेळत असताना डोहाच्या दिशेने गेला. डोहाजवळ त्याचा पाय घसरल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: three years old boy drowning in river