वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; १९ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 12:20 IST2020-11-01T12:19:54+5:302020-11-01T12:20:19+5:30

Washim coronavirus news आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली.

Three more killed in Washim district; 19 corona positive | वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; १९ कोरोना पाॅझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; १९ कोरोना पाॅझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली. आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान शनिवारी दिवसभरात १९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७०३ वर पोहचली आहे. 
शनिवारी आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली तर एकूण १९ जण पाॅझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम शहरातील समर्थनगर येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, सेक्युरा हॉस्पिटल परिस १, मसोला खु. १, मंगरूळपीर शहरातील १, मालेगाव शहरातील १, वसारी येथील १, रिसोड शहरातील १, भरजहांगीर ६, मांगुळझनक १, कारंजा शहरातील ३, लोहारा १, कामरगाव १ अशा १९ जणांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी २५ जणांनी कोरोनावर मात केली. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७०३ वर पोहचली आहे. यापैकी ५१२२ जण बरे झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

Web Title: Three more killed in Washim district; 19 corona positive