तीन वाहनांचा अपघात तिघांचा मृत्यू; २४ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 04:54 IST2018-05-08T04:54:11+5:302018-05-08T04:54:11+5:30
दोन ट्रक व लक्झरी बसच्या अपघातात तीन जण ठार तर २४ जण जखमी झाले. मालेगाव - अकोला महामार्गावरील रिधोरा फाट्याजवळ सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

तीन वाहनांचा अपघात तिघांचा मृत्यू; २४ जखमी
मालेगाव(वाशिम) : दोन ट्रक व लक्झरी बसच्या अपघातात तीन जण ठार तर २४ जण जखमी झाले. मालेगाव - अकोला महामार्गावरील रिधोरा फाट्याजवळ सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
लक्झरी बस अकोल्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या आयशर ट्रकशी टक्कर झाली. त्यानंतर ही दोन्ही वाहने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुसºया एका ट्रकवर आदळली. यामध्ये आयशरचा वाहक अब्दुल नदीम (१८, रा. बुºहाणपूर एमपी), वाहक शेख शकील, तसेच लक्झरीमधील दिलीप जाधव (३२, रा. खिर्डा ता. कारंजा) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना वाशिम, अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.